Tharla Tar Mag Promo Viral : 'ठरलं तर मग' मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सायली आणि अर्जुनचा प्रवास प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आहे. त्यांच्या प्रत्येक आनंदी क्षणात प्रेक्षक सहभागी झाले आणि त्यांच्या अप्स अँड डाऊनमध्येही ते भावनिक झाले.
आता या लोकप्रिय मालिकेत सर्वात मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे. बाळाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरु असतानाच सायलीच्या आयुष्यात वादळ येणार आहे. ऐन डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात पोलीस सायलीला अटक करणार आहेत. अनाथाश्रमातील मुलींची तस्करी केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. आनंदाच्या क्षणात घडणारी ही अनपेक्षित घटना अर्जुन आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणार आहे.
नव्या प्रोमोला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला
या खळबळजनक ट्वीस्टची झलक दाखवणाऱ्या नव्या प्रोमोला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या काही तासांत प्रोमोने 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.याला 350 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. सायलीच्या पाठीशी उभे राहत प्रेक्षकांनी तिच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे आणि पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.
नक्की वाचा >> Dhule News: लोकांच्या डोळ्यासमोर 'तो' पुराच्या पाण्यात वाहून गेला, पण मोबाईलमुळे..लाईव्ह थरार कॅमेरात कैद
'ठरलं तर मग मालिकेला चार वर्ष पूर्ण होतील.या चार वर्षात प्रेक्षकांची साथ मोलाची होती.मालिकेतली एखादी गोष्ट आवडली तर प्रेक्षकांनी पाठ थोपटली.कधी चुकलो तर हक्काने कान पिळले.मालिकेचा पुढचा प्रवास आता अधिक रंजक होणार आहे.डोहाळ जेवणाच्या दिवशी सायलीला अटक होण्याच्या प्रोमोला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला हे पाहून खूप भारावून गेले.प्रेक्षकांना एकच आवाहन आहे, अशीच सोबत द्या,अशी भावना जुई गडकरीने व्यक्त केली.'
सत्य जगासमोर आणण्यासाठी ती खंबीरपणे लढणार
मात्र सायली इतक्यात हार मानणाऱ्यांपैकी नाही.स्वतःवरील खोटे आरोप दूर करून सत्य जगासमोर आणण्यासाठी ती खंबीरपणे लढणार आहे. कारण आई होणारी स्त्री केवळ नवीन जीवाला जन्म देत नाही, तर आपल्या बाळाच्या भविष्यासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाण्याचं बळही तिच्यात असतं. एक आई आपल्या मुलासाठी कोणत्याही वादळाशी दोन हात करू शकते. सायलीचाही हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या बाळाच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि सत्याच्या विजयासाठी असणार आहे. तेव्हा नक्की पाहा ठरलं तर मग रात्री 8.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.