जाहिरात

Dhule News: लोकांच्या डोळ्यासमोर 'तो' पुराच्या पाण्यात वाहून गेला, पण मोबाईलमुळे..लाईव्ह थरार कॅमेरात कैद

दुसाने येथील प्रदीप पाटील यांचा मृतदेह भांडणे शिवारातील पांझरा आणि कान नदीच्या संगमाजवळ आढळून आला.पाटील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं दृष्य कॅमेरात कैद झालं.

Dhule News: लोकांच्या डोळ्यासमोर 'तो' पुराच्या पाण्यात वाहून गेला, पण मोबाईलमुळे..लाईव्ह थरार कॅमेरात कैद
Man Swept Into River Flood Water Video Viral

नागिंद मोरे, प्रतिनिधी 

Panjhora And Kaan River Flood Video : राज्यात अनेक ठिकाणी अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुराच्या पाण्यात गाड्या वाहून गेल्याच्या घटनाही काही भागात घडल्या आहेत.अशातच साक्री तालुक्यातील नांदवण येथील पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. दुसाने येथील प्रदीप पाटील यांचा मृतदेह भांडणे शिवारातील पांझरा आणि कान नदीच्या संगमाजवळ आढळून आला.पाटील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं दृष्य कॅमेरात कैद झालं असून हा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुरात वाहून गेल्यानंतरही मोबाईल सुरु होता आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, पुरात वाहून गेल्यानंतरही पाटील यांच्याजवळ असलेला मोबाईल सुरू होता. या मोबाईच्या आधारे त्यांची ओळख पटली.या घटनेनंतर नांदवण पुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, प्रदीप पाटील पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> TET पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात, गुंगारा देणाऱ्या साथीदारालाही पकडलं, मोठे खुलासे समोर

प्रदीप पाटील यांचा पुरातील थरकाप उडवणारा व्हिडीओ 

मृत प्रदीप पाटील हे दुसाने येथील रहिवासी होते.त्यांच्या जवळ असलेला मोबाईल सुरू असल्याने त्यांची ओळख पटवणे शक्य झाले.या घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

नक्की वाचा >> PM Narendra Modi Video : पीएम नरेंद्र मोदींच्या 'या' व्हिडीओनं केला जागतिक विक्रम! जगभरात झालाय तुफान व्हायरल

दरवर्षी नांदवण पुलावरून पाणी वाहत असताना अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.अनेकांचे जीव गेल्यानंतरही उंच पूल उभारण्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com