K-Pop Industry: दिवसाला 18 तास काम आणि जेवणावर निर्बंध, के-पॉप इंडस्ट्रीचा हा काळा चेहरा तुम्हाला माहित आहे?

K-Pop Industry Dark Truth: डान्स, गाणे, अभिनय आणि परदेशी भाषा शिकण्यासाठी त्यांना दिवसातील 12 ते 18 तास मेहनत करावी लागते. इतकेच नाही तर त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि वजनावर कडक निर्बंध असतात.

जाहिरात
Read Time: 3 mins
K-Pop : के पॉप इंडस्ट्रीमधील झगमगटामागे काळी बाजू देखील आहे.
मुंबई:

K-Pop Industry Dark Truth: के-पॉप जगातील ग्लॅमर आणि झगमगाट याची तरुणाईमधील क्रेझ दिवसोंदिवस वाढत आहे.  आजच्या काळात जगभरातील तरुण बीटीएस, ब्लॅकपिंक, न्यूजीन्स आणि एस्पा सारख्या बँड्सच्या प्रेमात पडले आहेत. त्यांचे डान्स, लूक आणि गाणी पाहून कोणालाही वाटेल की त्यांचे आयुष्य किती स्वप्नवत असेल. पण या झगमगाटाच्या पडद्यामागे एक भयंकर आणि काळं सत्य दडलं आहे. ज्या आयडल्सना आपण पडद्यावर हसताना पाहतो, त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची आणि वेदनेची ही बाजू मनाला चटका लावणारी आहे.

के-पॉप ट्रेनिंगमधील अघोरी वास्तव

के-पॉप स्टार बनण्याचा प्रवास हा एखाद्या अग्निपरिक्षेपेक्षा कमी नसतो. वयाच्या अवघ्या 10 ते 11 व्या वर्षापासून मुलांना एजन्सीमध्ये भरती केले जाते. तिथे त्यांना 5 ते 10 वर्षे कठोर ट्रेनिंग घ्यावे लागते. 

डान्स, गाणे, अभिनय आणि परदेशी भाषा शिकण्यासाठी त्यांना दिवसातील 12 ते 18 तास मेहनत करावी लागते. इतकेच नाही तर त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि वजनावर इतके कडक निर्बंध असतात की त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अनेक रिपोर्ट्सनुसार, टोकाचा डाएट आणि प्रचंड मानसिक तणावामुळे तब्बल 80 टक्के ट्रेनी मुलींना मासिक पाळीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

( नक्की वाचा : Online Game: 'आम्ही भारतीय नाही, कोरियन आहोत!' 3 सख्ख्या बहिणींच्या मृत्यूचं कारण ठरलेला तो गेम आहे तरी काय? )

स्लेव कॉन्ट्रॅक्ट्स आणि कलाकारांची घुसमट

या इंडस्ट्रीमध्ये स्लेव कॉन्ट्रॅक्ट्स ही संकल्पना अत्यंत क्रूर आहे. एजन्सी कलाकारांसोबत असे करार करतात ज्यामध्ये त्यांच्या खासगी आयुष्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले जाते. त्यांना डेटिंग करण्याची परवानगी नसते, पगार कमी दिला जातो आणि नफ्यातील मोठा हिस्सा एजन्सी स्वतःकडे ठेवते. 

Advertisement

2025 मध्ये न्यूजीन्स आणि एडोर या एजन्सीमधील वाद याच गुलामगिरीचा एक भाग म्हणून समोर आला. न्यूजीन्सने त्यांच्यावर होणारी दादागिरी, छळ आणि फसवणुकीचे आरोप केले, ज्याने मोठ्या कंपन्यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

( नक्की वाचा : UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेचे 12 नियम बदलले, OBC आणि EWS बाबत मोठे अपडेट, वाचा A to Z माहिती )

मानसिक आरोग्याचा गंभीर धोका

के-पॉप आयडल्सवर नेहमीच परफेक्ट दिसण्याचे आणि वागण्याचे प्रचंड दडपण असते. या दबावामुळे अनेक स्टार्स डिप्रेशन आणि एंग्जायटीच्या विळख्यात अडकतात. शाइनी बँडचा जोंघुइन, सुली आणि गू हारा यांसारख्या प्रसिद्ध स्टार्सनी केलेल्या आत्महत्या या ग्लॅमरस जगातील नैराश्याचे उदाहरण आहेत. 

Advertisement

सोशल मीडियावरील ट्रोलिंग, चोवीस तास पाठलाग करणारे चाहते आणि कामाचा ताण यामुळे कलाकारांचे मानसिक आरोग्य पूर्णपणे कोलमडून जाते.

 फसवणूक आणि शोषण

टीव्हीवर दिसणारे के-पॉप सर्व्हायव्हल शो देखील वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. व्होटिंगमध्ये होणारी फेरफार, एडिटिंगचा चुकीचा वापर आणि स्पर्धकांना दिली जाणारी वागणूक यावर अनेकदा टीका झाली आहे. एमनेट सारख्या चॅनेलवर पोलीस तपास होऊनही आणि निर्मात्यांना जेल होऊनही ही परिस्थिती बदललेली नाही. 2025 मध्ये देखील अशा शोमध्ये स्पर्धकांचा छळ करणे आणि त्यांना असुरक्षित वातावरणात ठेवल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.
 

Topics mentioned in this article