Dawood Ibrahim: दाऊद, ऋषी कपूर आणि 'तवायफ'चे कनेक्शन! दुबईतील त्या भेटीचा रंजक इतिहास

दाऊदने त्यांना सांगितले की, तो स्वतः दारू पित नाही आणि कोणाला पाजतही नाही, म्हणून त्याने खास चहा-बिस्किटांचा बेत आखला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासोबत भेटीचा उल्लेख केला आहे
  • दाऊदने ऋषी कपूर यांना चहासाठी आपल्या घराला बोलावले आणि त्यांना आदरातिथ्य दिले
  • या भेटीत दाऊदने ऋषी कपूर यांच्या १९८५ च्या चित्रपटातील दाऊद नावाच्या पात्राचे कौतुक केले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या भेटीचे अनेक किस्से चर्चेत असतात. ऋषी कपूर यांनी स्वतः त्यांच्या 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रात एका अशा भेटीचा उल्लेख केला आहे. जिथे दाऊदने त्यांना चहासाठी आपल्या घरी बोलावले होते. विशेष म्हणजे, दाऊदने ऋषी कपूर यांच्या एका फ्लॉप ठरलेल्या सिनेमाचे तोंडभरून कौतुक केले होते. १९८५ च्या या चित्रपटात ऋषी कपूर यांच्या पात्राचे नाव 'दाऊद' होते. जे अंडरवर्ल्ड डॉनला भावले होते. गुन्हेगारी जगाचा प्रभाव असलेल्या त्या काळात, एका अभिनेत्याला चहासाठी घरी बोलावणे आणि चित्रपटांवर चर्चा करणे ही घटना आजही थक्क करणारी आहे.

1988 मध्ये ऋषी कपूर एका कार्यक्रमासाठी दुबईला गेले होते. विमानतळावरून बाहेर पडताच एका व्यक्तीने त्यांची भेट घेतली. त्यानंतर फोनवर दाऊदशी बोलणे करून दिले. दाऊदने त्यांना आदरातिथ्यासाठी विचारले आणि चहा पिण्यासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले. ऋषी कपूर आपल्या एका मित्रासह तिथे जाण्यास तयार झाले. त्यांनी त्यानंतर दाऊदचे घर गाठले होते. घरी जावून त्यांनी तिथे चहा ही घेतला. त्यांनी हा किस्सा आपल्या आत्मचरित्रात लिहीला आहे.

Advertisement

नक्की वाचा - थलापती विजयच्या यशानंतर त्रिशाची चर्चा; कोट्यवधी मालमत्तेची मालकीण असलेल्या या अभिनेत्रीची नेटवर्थ माहितीये?

ऋषी कपूर यांना नेण्यासाठी हॉटेलबाहेर एक आलिशान गाडी आली होती. घराचा पत्ता कोणालाही कळू नये, यासाठी गाडीने अनेक वळणे घेऊन रस्ता बदलला. दाऊदच्या घरी पोहोचल्यावर त्याने स्वतः ऋषी कपूर यांचे स्वागत केले. दाऊदने त्यांना सांगितले की, तो स्वतः दारू पित नाही आणि कोणाला पाजतही नाही, म्हणून त्याने खास चहा-बिस्किटांचा बेत आखला होता. असं ऋषी कपूर यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Nagraj Manjule: नागराज मंजुळेसह जिओ सिनेमाला पुणे न्यायालयाचा दणका! 'खाशाबा'चा वाद थेट कोर्टात

गप्पांच्या ओघात दाऊदने सांगितले की, तो राज कपूर आणि दिलीप कुमार यांचा मोठा चाहता आहे. त्याने आपल्या आवडत्या सिनेमाचे नाव घेतले - 'तवायफ'. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ऋषी कपूर यांनी 'दाऊद' नावाच्या तरुणाची भूमिका साकारली होती. आपल्या नावाशी साधर्म्य असल्यामुळेच दाऊदला हा चित्रपट अत्यंत प्रिय होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही, तरीही दाऊदच्या तो लक्षात राहिला.