जाहिरात

Nagraj Manjule: नागराज मंजुळेसह जिओ सिनेमाला पुणे न्यायालयाचा दणका! 'खाशाबा'चा वाद थेट कोर्टात

Khashaba Movie Controversy: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आगामी 'खाशाबा' चित्रपट पुन्हा एकदा कायदेशीर वादात अडकला आहे. कॉपीराईटचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यामुळे पुणे सत्र न्यायालयाने नागराज मंजुळे, जिओ स्टुडिओ आणि निर्मात्यांना नोटीस बजावली आहे.

Nagraj Manjule: नागराज मंजुळेसह जिओ सिनेमाला पुणे न्यायालयाचा दणका! 'खाशाबा'चा वाद थेट कोर्टात

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित 'खाशाबा' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुणे दिवाणी न्यायालयात या चित्रपटाबाबत कॉपीराईटचा दावा सुरू असतानाच, 1 मे पासून चित्रपटगृहात ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या कृतीची दखल घेत पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे, निर्मात्या ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शनला नोटिसा बजावल्या आहेत.

काय आहे नेमका वाद?

डिसेंबर 2024 पासून या चित्रपटाच्या कथेवरून वाद सुरू आहे. लेखक संजय दुधाणे यांनी 'खाशाबा' चित्रपटाच्या कथेवर आपला हक्क (Copyright) असल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली आहे.  खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे अधिकृत प्रमाणपत्रही आहे.

(नक्की वाचा-  DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)

ट्रेलरमुळे आक्षेप

या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच नागराज मंजुळे यांनी 1 मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्याने लेखक दुधाणे यांनी ॲड. रवींद्र शिंदे आणि ॲड. सुवर्णा शिंदे यांच्यामार्फत 2 मे रोजी न्यायालयात स्थगितीसाठी अर्ज दाखल केला.

8 मे रोजी होणार तातडीची सुनावणी

न्यायालयाने या अर्जाची गंभीर दखल घेतली असून, 8 मे रोजी याप्रकरणी तातडीने सुनावणी होणार आहे. तोपर्यंत चित्रपटाच्या पुढील प्रक्रियेला स्थगिती मिळणार का, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात नागराज मंजुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

(नक्की वाचा-  Dombivli News: खाऊ आणायला गेलेली आई आलीच नाही; 3 चिमुरड्यांचे रस्त्यावरच रडून-रडून हाल!)

लेखकाची भूमिका

लेखक संजय दुधाणे म्हणाले की, "आमचा विरोध जिओ स्टुडिओ किंवा ज्योती देशपांडे यांना नाही. मात्र, नागराज मंजुळे यांनी माझ्यावर 5 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता, त्यातूनच हा चित्रपट माझ्या पुस्तकावर आधारित असल्याचे सिद्ध होते. सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्याने मी अधिक भाष्य करणार नाही."
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com