Deool Band 2 Day 26 Box Office : 'देऊळ बंद २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, प्रवीण तरडे यांच्यासारख्या दर्जेदार स्टार्सचा करिष्मा पाहायला मिळाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत आहे. देऊळ बंद २ चित्रपटाच्या निर्मिती प्रवीण तरडेने केली आहे. आता 'देऊळ बंद २' हा २०२६ चा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर एक नजर टाकूया.
'देऊळ बंद २' ने रचला नवा इतिहास...
'देऊळ बंद २' चित्रपटाचे बजेट १० कोटींपर्यंत आहे. चित्रपटाने भारतात नेट ६८.७२ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन ८१.०८ कोटी आहे. तर चित्रपटाचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ५८.७२ कोटी आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ५८७.२ टक्के आहे.
यासोबत २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला आहे. 'देऊळ बंद २'ने बॉक्स ऑफिसवर 'क्रांतिज्योती विद्यालय ' चित्रपटालाही मागे टाकलं आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपटाचं बजेट ४ कोटींपर्यंत होतं आणि या चित्रपटाने २७.३५ कोटींची कमाई केली होती. चित्रपटाने ५८३.७५ टक्के नफा दिला होता. सुरुवातील हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर होता आणि दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
२६ व्या दिवशी 'देऊळ बंद २'ने किती कमाई केली?
देऊळ बंद २ चित्रपटाने २६ व्या दिवशी ५० लाखांची कमाई केली. २५ व्या दिवशी चित्रपटाने १.२७ कोटींची कमाई केली होती.
चित्रपटाचा आठवड्यानुसार कलेक्शन...
चित्रपटाने पहिल्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात ३०.२ कोटींचं कलेक्शन केलं. दुसऱ्या आठवड्यात २२.४ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ११.१५ कोटींचं कलेक्शन केलं होतं. २३ व्या दिवशी १.२७ कोटी, २४ व्या दिवशी १.४ कोटींचं कलेक्शन, २५ व्या दिवशी १.८ कोटी, २६ व्या दिवशी चित्रपटाने ५० लाखांची कमाई केली.