Dharmendra asthi visarjan : बॉलिवूडचा सुपरस्टार आणि अभिनेत्रींचा चाहता हिमॅन धर्मेंद्र यांनी २४ नोव्हेंबरला वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. आज ९ दिवसांनी त्यांचं अस्थिविसर्जन करण्यात येणार आहे. (dharmendra's asthi visarjan) त्यांच्या जन्मगावापासून पाच तासांच्या अंतरावर अस्थिंचं विसर्जन करण्यात येणार आहे.
कुठे करणार अस्थिविसर्जन? (Dharmendra's ashes immersion)
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या अस्थी घेऊन कुटुंबीय उत्तराखंडच्या हरिद्वारला पोहोचले आहेत. आज बुधवारी हरिद्वारच्या व्हिआयपी घाटावर त्यांच्या अस्थिंचं विसर्जन करण्यात येणार आहे. २ डिसेंबर रोजी सनी देओल, बॉली देओलसह त्यांचं संपूर्ण कुटुंबीय अस्थी घेऊन हरिद्वार येथील पीलीभीत हॉटेलमध्ये पोहोचले होते. २ डिसेंबरलाच अस्थी विसर्जन करण्यात येणार होतं. मात्र कुटुंबातील कोणी सदस्य उपस्थित नसल्याने २ डिसेंबरला अस्थिविसर्जन करता आलं नाही. त्यामुळे आज ३ डिसेंबरला धर्मेंद्र यांच्या अस्थिंचं विसर्जन करण्यात येणार आहे. धर्मेंद्र यांचं जन्म पंजाबमधील लुधियानामधील एका गावात झाला. त्यांच्या घरापासून साधारण २५० किलोमीटर अंतरावर हरिद्वार येथे धर्मेंद्र यांचं अस्थिविसर्जन करण्यात येणार आहे.
नक्की वाचा - Dharmendra News : बॉबी देओलला 'ती' आवडायची अन् तिला धर्मेंद्र! देओल कुटुंबातील ट्रायअँगल; कोण आहे अभिनेत्री?
हेमा मालिनी राहणार का उपस्थित?
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यावर जीवापाड प्रेम केलं. दुसरं लग्न केल्यानंतरही त्यांनी पहिल्या कुटुंबाला कधी दूर लोटलं नाही. धर्मेंद्र यांच्या अस्थिविसर्जनासाठी सनी आणि बॉबी देओल यांचं कुटुंबीय उपस्थित असल्याची माहिती आहे. हेमा मालिनी अस्थिविसर्जनादरम्यान उपस्थित राहणार की नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.