Dharmendra 90th Birthday: धर्मेंद्र यांच्या 90व्या वाढदिवशी ग्रँड सेलिब्रेशन! कधी आहे पार्टी-कोण होणार सहभागी?

Dharmendra 90th Birthday Planning: धर्मेंद्र यांच्या 90व्या वाढदिवशी ग्रँड सेलिब्रेशन करण्यासाठी जोरदार तयारीला सुरुवात झालीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Dharmendra 90th Birthday Planning : धर्मेंद यांचा वाढदिवस कधी आहे?"
PTI

Dharmendra 90th Birthday Planning: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र ज्यांना हिंदी सिनेसृष्टीमध्ये 'ही-मॅन' या नावाने ओळखले जाते. प्रकृती बिघडल्याने ते गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर (Dharmendra Health Updates) औषधोपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टरांच्या एका टीमच्या देखरेखी अंतर्गत धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान 12 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्जार्च देण्यात आला. या दिलासादायक वृत्ताने चाहते सुखावले होते. धर्मेंद्र यांची तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी मित्रपरिवार आणि चाहते प्रार्थना करत आहेत.  

देओल कुटुंबामध्ये सकारात्मक वातावरण

धर्मेंद्र घरी परतल्यानंतर देओल कुटुंबामध्ये पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण निर्माण होतंय. वडिलांच्या काळजीपोटी सनी देओल आणि बॉबी देओल तणावात दिसत होते. या घडामोडींदरम्यान चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आलीय. देओल कुटुंबीयांच्या जवळच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची ऊर्जा आणि चेहऱ्यावरील हास्य नेहमीप्रमाणे आजही कायम आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने येत्या काही दिवसांत ते पूर्वीप्रमाणे अ‍ॅक्टिव्ह होतील, अशी आशा सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालीय.

(नक्की वाचा: Dharmendra Family: 2 पत्नी, 2 मुलं, 4 लेकी आणि 13 नातवंड! धर्मेंद्र यांचे इतकं मोठं आहे कुटुंब)

धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस जल्लोषात होणार साजरा | Dharmendra 90th Birthday Celebration News

याच पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांच्या 90व्या वाढदिवसाची तयार देखील जोरात सुरू असल्याची माहिती समोर आलीय. 8 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्याची योजना आखली जातेय. रिपोर्ट्सनुसार, हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या यंदाच्या वाढदिवसानिमित्त खास फॅमिली गेट-टुगेदर आयोजित करण्याचा विचार करत आहेत. या कार्यक्रमामध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी होतील. 

Advertisement

(नक्की वाचा: Dharmendra And Hema Malini: हेमा मालिनींना या नावाने हाक मारतात सनी देओल आणि बॉबी देओल, ड्रीमगर्लने केला होता सर्वांसमोर खुलासा)

Advertisement

धर्मेंद्र यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत असल्याने देओल कुटुंबीयामधील आनंद द्विगुणित झालाय. पुढील महिन्यात धर्मेंद्र यांचा 90 वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याची तयारी सुरू झालीय.