Dharmendra Health Update : अभिनेता धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? निधनाबद्दलच्या वृत्ताचं सत्य आलं समोर

बॉलिवूडचे सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dharmendra Health Update : बॉलिवूडचे सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कालपासून धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. दरम्यान धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओल हिने इन्स्टावर पोस्ट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. 


इशा देओलची पोस्ट चर्चेत

इशा देओलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने म्हटलं, माध्यमांतून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझे वडील धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या कुटुंबाची प्रायव्हेसी जपावी. वडिलांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी तुमच्या प्रार्थनेसाठी धन्यवाद. 

कलाकारांनी घेतली भेट

धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच, संपूर्ण बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी रुग्णालयात धाव घेतली. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने सोमवारी सायंकाळी रुग्णालयात येऊन धर्मेंद्र यांची विचारपूस केली.

Advertisement

335 कोटींचे साम्राज्य आणि विविध क्षेत्रांत गुंतवणूक

धर्मेंद्र यांनी सुमारे 300 चित्रपटांच्या (Films) करिअरमध्ये केवळ अभिनयच नाही, तर एक मोठे आर्थिक साम्राज्य (Empire) देखील उभे केले. आज त्याची एकूण नेटवर्थ जवळपास 335 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याने अनेक क्षेत्रांत गुंतवणूक (Investments) केली आहे, ज्यात हॉस्पिटल्सपासून (Hospital Field) ते रेस्टॉरंट (Restaurant Business) व्यवसायाचा समावेश आहे.

त्यांनी 'गरम धरम ढाबा' (Garam Dharam Dhaba) नावाचा रेस्टॉरंट व्यवसाय सुरू केला. याशिवाय त्याने करनाल हायवे (Karnal Highway) वर 'ही-मॅन' (He-Man) नावाचे आणखी एक आलिशान रेस्टॉरंट उघडले आहे.

Advertisement