Dharmendra Health Update: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी (12 नोव्हेंबर 2025) ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय आणि त्यांच्या प्रकृतीची देखभाल आता घरीच घेतली जाणार आहे. देओल कुटुंबीयांनी याबाबतची माहिती दिलीय. अचानक प्रकृती बिघडल्यानं धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरवल्या गेल्या होत्या. सनी देओल यांच्या जनसंपर्क प्रतिनिधीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, "श्री धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय आणि त्यांच्या प्रकृतीची काळजी घरीच घेतली जाईल. आम्ही मीडिया आणि सामान्य जनतेला विनंती करतो की कोणतेही अंदाज वर्तवू नये आणि धर्मेंद्र तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करावा. धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारण्यासाठी, निरोगी आरोग्य, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्याबाबत आम्ही सर्वांचे आभार मानतो".
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी माहिती | VIDEO | Mumbai Dr. Pratit Samdani
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर औषधोपचार करणारे ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डॉ. प्रतीत समदानी यांनीही डिस्चार्जच्या वृत्तास दुजोरा दिलाय. डॉ. प्रतीत समदानी यांनी म्हटलं की, धर्मेंद्र यांना सकाळी 7.30 वाजता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. कुटुंबीयांनी त्यांच्यावर घरीच औषधोपचार करण्याचा निर्णय घेतलाय.
बुधवारी सकाळी अॅम्ब्युलन्सच्या मदतीने धर्मेंद यांना सनी देओलच्या जुहूमधील निवासस्थानी नेण्यात आले. दरम्यान मंगळवारी (11 नोव्हेंबर) धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या पण कुटुंबीयांने हे वृत्त खोटं असल्याचे स्पष्ट केले.
(नक्की वाचा: Dharmendra And Hema Malini: हेमा मालिनींना या नावाने हाक मारतात सनी देओल आणि बॉबी देओल, ड्रीमगर्लने केला होता सर्वांसमोर खुलासा)
धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलने मंगळवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, "मीडिया आवश्यकतेपेक्षा अधिक सक्रियता दाखवतेय आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होतेय. बाबांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केल्याबाबत धन्यवाद".
हेमा मालिनी यांनीही निधनाच्या अफवांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
मंगळवारी शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खानसह अन्य बॉलिवूड कलाकारांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन धर्मेंद्र यांची भेटही घेतली.