Dharmendra: मी धर्मेंद्रसारखा लालची नाही...कोणत्या अभिनेत्यानं केले होते हे विधान? पडत्या काळात मदतीलाही धावले

Dharmendra News: धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांचे अंतिम दर्शन न मिळाल्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Dharmendra: धर्मेंद्र यांना कोणी म्हटलं होतं लालची"
Social Media

Dharmendra News: धर्मेंद्र हे बॉलिवूडचे असे पहिले सुपरस्टार आहेत, ज्यांनी 50 वर्षांच्या कारर्किदीमध्ये नोंदवलेला रेकॉर्ड कोणताही कलाकार मोडू शकला नाही. त्यांना ज्या पद्धतीने लोकप्रियता मिळाली होती, तशीच प्रसिद्धी मिळवण्याचे स्वप्न अनेक कलाकारांनी पाहिले. धर्मेंद्र यांनी 1960मध्ये त्यांच्या कारकिर्दीस सुरुवात केली आणि एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे दिले. यशाच्या शिखरावर असताना त्यांच्यावर टीकाही होऊ लागली.  

धर्मेंद्र यांना कोणत्या अभिनेत्याने लालची म्हटलं होतं?

मनोज कुमार जे 'भारत कुमार' या नावानेही ओळखले जातात. त्यांनी एकदा धर्मेंद्र आणि शशी कपूर यांना लालची म्हटलं होतं. चित्रपट समीक्षक सुभाष के झा यांच्याशी बातचित करताना, मनोज यांनी स्टारडमबाबत आपलं मत मांडलं होतं. प्रश्नही उपस्थित केला होता की, केवळ जवळपास 30 सिनेमांचं दिग्दर्शन आणि नेतृत्व करण्यापुरतेच ते मर्यादित का राहिले? 

मनोज यांनी पुढे असंही म्हटलं की, "मी एक लालची फिल्मी माणूस नाहीय, अगदी अभिनेता म्हणूनही नाहीय. माझे सहकलाकार धर्मेंद्र आणि शशी कपूर यांनी जवळपास 300-300 चित्रपटांमध्ये काम केलं, तर मी माझ्या संपूर्ण कारर्किदीत फक्त 35 सिनेमांमध्ये काम केलंय".  

Advertisement

(नक्की वाचा: Dharmendra: मौसमी चॅटर्जींचा थेट नकार, सनी देओलसाठी धर्मेंद्र पोहोचले घरी; मागेल ती किंमत द्यायला झाले तयार)

मनोज कुमार यांनी कोणत्या अभिनेत्याला घेऊन दिलं होतं शर्ट?

सनी देओलनं मनोज कुमार यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितलं होतं की, वडील धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये संघर्ष करत असताना मनोज कुमार यांनी मदत केली होती. मनोज यांच्या तुलनेत वडील त्यावेळेस संघर्ष करत होते. एकेदिवशी मनोज कुमार खरेदीसाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी माझ्या वडिलांसाठीही काही शर्ट खरेदी केले होते. 

मनोज कुमार यांची ही कृती पाहून सनी म्हणाला होता की, मी असे प्रेम शोधतोय पण आजकाल ते मिळत नाही.

Advertisement

(नक्की वाचा: Dharmendra: शत्रुघ्न सिन्हा धर्मेंद्रंच्या दोन्ही कुटुंबीयांच्या भेटीला,भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कसे होते भेटीचे क्षण)

धर्मेंद्र यांचं निधन कधी झालं? 

धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. विलेपार्ले स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडकरही तेथे दाखल झाले होते.