अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असताना यांच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांमध्ये चिंता होती. मात्र, मंगळवारी त्यांची कन्या ईशा देओलने त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. सुरूवातीला त्यांच्या प्रकृती बाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र त्यावर कुटुंबीयांनीच पुर्णविराम दिला आहे. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा असतानाच, त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेच्या कायदेशीर वारसा हक्कावरही चर्चा सुरू झाली आहे.
धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती पाहीली तर थक्क व्हायला होईल. धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 335 ते 450 कोटी रुपयांदरम्यान आहे. यात त्यांच्या यशस्वी अभिनय कारकिर्दीतून मिळवलेला पैसा आणि मोठ्या प्रमाणात असलेली स्थावर मालमत्ता (Real Estate Portfolio) यांचा समावेश आहे. लोणावळ्यातील 100 एकरचा फार्म हाऊस हे त्यांच्या मालमत्तेचा मोठा भाग आहे. याशिवाय 'विजयता फिल्म्स' (चित्रपट निर्मिती) आणि 'गरम धरम ढाबा' सारख्या रेस्टॉरंट्समधूनही त्यांना मोठी कमाई होते. त्यातून त्यांनी ही संपत्ती उभी केली आहे.
वारस हक्कावर हिंदू विवाह कायद्याचा प्रभाव असतो. धर्मेंद्र यांनी दोन विवाह केले आहेत. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर जिवंत असताना आणि घटस्फोट न होता त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरा विवाह केला. 2023 च्या एका निर्णयानुसार, पहिली पत्नी जिवंत असताना केलेला दुसरा विवाह हिंदू विवाह कायदा (HMA) अंतर्गत 'अवैध' मानला जातो. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या संपनत्तीत दुसऱ्या पत्नीचा अधिकार असतो का हा विषय आता चर्चीला जात आहे.
पहिल्या पत्नीच्या मुलांचा म्हणजे सनी, बॉबी, विजेता आणि अजिता यांचा वडिलांच्या स्व-अर्जित मालमत्तेवर पूर्ण आणि समान हक्क असेल. परंतु, वडिलोपार्जित संपत्तीवर मात्र त्यांना थेट अधिकार मिळत नाही. याउलट, हेमा मालिनी यांच्या मुली, ईशा आणि अहाना देओल यांना वडिलांच्या स्व-अर्जित मालमत्तेबरोबरच म्हणजेच वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क मिळेल. कायदेशीर भाषेत याला 'नोशनल पार्टिशन' (Notional Partition) म्हणतात. याचा अर्थ, वडिलोपार्जित मालमत्तेत धर्मेंद्र यांच्या वाट्याला आलेला हिस्सा त्यांच्या सर्व वारसांमध्ये म्हणजेच 6 अपत्यांमध्ये समान वाटला जाईल.