Dharmendra First Wife Prakash Kaur : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (८९) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लाखो-कोटी चाहत्यांकडून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे. ( How many children does Dharmendra have)
चित्रपटातील जबरदस्त अभिनयातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. धर्मेंद्रने दोन लग्न केली आहेत. धर्मेंद्रचं पहिलं लग्न प्रकाश कौर हिच्याशी तर दुसरं लग्न हेमा मालिनीसोबत झालं. धर्मेंद्रने पहिलं लग्न कधी केलं होतं, आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश काय करते?
धर्मेंद्रने १९५४ मध्ये केलं पहिलं लग्न...l Dharmendra First Marriage
धर्मेंद्रने १९५४ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी पहिलं लग्न केलं होतं. त्याने प्रकाश कौर हिच्यासोबत अरेंज मॅरेज केलं होतं. पाहायला गेलं तर ७१ वर्षांपूर्वी त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. धर्मेंद्र याचं लग्न झालं तेव्हा चित्रपट क्षेत्रात ते सक्रिय नव्हते. १९६० मध्ये त्याने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. दुसरीकडे धर्मेंद्र याची पत्नी प्रकाश कौर अत्यंत सुंदर होती. मात्र तरीही त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला नाही. प्रकाश कौर या हाऊसवाइफ होत्या. त्यांना चार मुलं होती. कौर यांचं आयुष्यं सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजेता देओल यांचा सांभाळ करण्यात गेलं. धर्मेंद्रची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांनी वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करिअर केलं. तर दोन्ही मुली अजीता आणि विजेता आईप्रमाणे चित्रपटक्षेत्रापासून लांब राहिल्या.

(सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजेता देओल, दुसऱ्या फोटोत इशा देओल आणि आहना देओल)
धर्मेंद्रने १९८० मध्ये केलं दुसरं लग्न... l Dharmendra Second Marriage
चित्रपटात काम करीत असताना धर्मेंद्र अभिनेत्री हेमा मालिनीच्या प्रेमात पडला. दोघांना लग्न करायचं होतं. मात्र हेमा मालिनीचे आई-वडील या लग्नास तयार नव्हते. धर्मेंद्रचं आधीच लग्न झालं होतं आणि त्याला चार मुलं होती. शेवटी १९८० मध्ये धर्मेंद्रने हेमा मालिनीसोबत लग्न केलं. दोघांना दोन मुली आहेत. इशा देओल आणि आहना देओल. पहिल्या पत्नीपासून चार आणि दुसऱ्या पत्नीपासून दोन, धर्मेंद्रला सहा मुलं आहेत.
अभिनेता धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे?
बॉलिवूडचे सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कालपासून धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. दरम्यान धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओल हिने इन्स्टावर पोस्ट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. वडिलांची प्रकृती स्थिर असल्याचं तिने आपल्या इन्स्टा पोस्टवरुन सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world