Dharmendra : धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचा पोस्टर आला समोर; Voice नोट ऐकून चाहते भावुक

धर्मेंद्र गेल्या अनेक दिवसापासून आजारी होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जाहिरात
Read Time: 2 mins
25 दिसंबर को रिलीज होगी धर्मेंद्र की इक्कीस

Dharmendra passed away : सुपरस्टार आणि बॉलिवूडचा हिटमॅन धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर राहत्या घरात उपचार सुरू होते. त्यातच एक दु:खद बातमी समोर आली आहे. धर्मेंद्र यांनी आज शेवटचा श्वास घेतला. 

सुपरस्टार धर्मेंद्र यांचा आगामी चित्रपट 'इक्कीस'चा नवा पोस्टर मेडॉक फिल्मसने शेअर केला आहे. हा पोस्टर सध्या व्हायरल होत आहे. यातील एका पोस्टरमध्ये धर्मेंद्र गंभीरपणे पाहताना दिसत आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, वडील मुलांचा सांभाळ करतात. महान लोक देशांचं पालन करतात. २१ वर्षीय अमर झालेल्या सैनिकाचे वडील म्हणून धर्मेंद्र भूमिका साकारत आहेत. 'इक्कीस'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही पोस्ट आज सकाळी ११.३० च्या दरम्यान तीन तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. 

'इक्कीस'च्या पोस्टरमध्ये दिसले धर्मेंद्र

गेल्या महिन्यात २९ ऑक्टोबरला निर्मात्यांनी 'इक्कीस'चा ट्रेलर प्रदर्शित केला होता. ज्यामध्ये परमवीर चक्र विजेता अरुण खेत्रपालचं साहस, सन्मान आणि बलिदानाची झलक पाहायला मिळाली होती. या चित्रपटात अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चन यांचा मुलगा आहे. तो या चित्रपटात एका शूर सैनिकाची भूमिका साकारत आहे. तर धर्मेंद्र, अरुणचे वडील एमएल. खेत्रपालच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 

Advertisement

अगस्त्य नंदाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण...

हा चित्रपट एका वडिलांचा भावनिक प्रवास दर्शवतो. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्या बापाच्या मुलाला वीरमरण येतं. युद्धात मुलाला गमावणाऱ्या बापाची ही कहाणी आहे. श्रीराम राघवतच्या चित्रपटात अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार याची भाजी सिमर भाटियादेखील आहे. तीदेखील या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. हा चित्रपट या वर्षी २५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलिज होईल.