धर्मेंद्रंची 450 कोटींची संपत्ती! हेमा मालिनीच्या लेकीला वडिलांची ही खास गोष्ट हवीये, तिने स्पष्टच सांगितलं

हेमा मालिनीच्या लेकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तिने वडिलांच्या संपत्तीतील काय हवंय याचं उत्तर दिलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dharmendra News : बॉलिवूडने २४ नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या सुपरस्टारपैकी एका स्टारला गमावलं. दिग्गज अभिनेता आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांना सिनेक्षेत्रात हि-मॅन म्हणून ओळखलं जातं. सहा दशकाच्या लांब करिअरमध्ये त्यांनी एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले. या चित्रपटांमधून त्यांचा काम चाहत्यांमध्ये कायम जिवंत राहिल. दरम्यान त्यांची लेक अहानाने एका जुन्या मुलाखतीत वडिलांकडील खास गोष्टीची मागणी केली आहे. अहानाने सांगितलं, वडिलांकडून मला पैसा-मालमत्ता नको, तर त्यांच्याकडील खास वस्तू हवी आहे. (Dharmendra wealth)

धर्मेंद्र आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले. दोन पत्नी, सहा मुलांमध्ये त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. धर्मेंद्र यांनी जगाच निरोप घेतला. मात्र आपल्यामागे ते कुटुंबासाठी ४५० कोटींची संपत्ती सोडून गेले. मात्र हेमा मालिनी यांची मुलगी अहाना देओल हिला त्यांच्या संपत्तीतील खास गोष्ट हवीये. 

वडिलांकडून मिळाली शिकवण अन् संस्कार...

धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये हेमा मालिनीसोबत लग्न केलं होतं. त्यांची पहिली मुलगी इशा देओलचा जन्म लग्नाच्या दुसऱ्या वर्षी आणि चार वर्षांनंतर दुसरी मुलगी अहानाचा जन्म झाला. धर्मेंद्र आणि त्यांच्या मुलींमध्ये भावनिक बंध कायम अतूट राहिला. अहानाने HerZindagiBuzz सोबतच्या एका मुलाखतीदरम्यान वडिलांकडून मिळणाऱ्या वारसा संपत्तीबद्दल सांगितलं. 

Advertisement

नक्की वाचा - Dharmendra : 300 हून अधिक चित्रपट, पद्मभूषण पुरस्काराने गौरव; धर्मेंद्र राज्य सन्मानापासून का राहिले वंचित?

ती म्हणाली, माझ्या वडिलांनी मला कायम प्रेमाने राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणायचे, जगात सर्वकाही प्रेम आणि स्नेहाशी जोडलेलं आहे. आनंदी राहा, आणि मजबूत-निरोगी राहा. हा सल्ला कदाचित खूप साधा वाटत असेल मात्र याचा अर्थ खूप खोल आहे. 

वडिलांकडून वारसात काय हवंय?

अहानाला जेव्हा वडिलांकडून वारशातून काय हवं याबाबत विचारलं, तर तिने पैसे, प्रसिद्धी किंवा लग्जरीबाबत विचार केला नाही. तिने दिलंल उत्तर ऐकूण सर्वजण हैराण झाले. क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, मी माझ्या वडिलांची पहिली कार, फिआट वारशात हवीये. याचं कारण देताना ती म्हणाली, ती अत्यंत सुंदर आणि विंटेज कार आहे. या कारशी त्यांच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. वडिलांची ही अशी एक वस्तू आहे जी मला स्वत:जवळ ठेवायला आवडेल. 

Advertisement