Dhurandhar Fa9La Dance Step: अक्षय खन्नाने अख्खं मार्केट खाल्लं! डान्स स्टेप कशी सुचली? सहकलाकाराचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याने फ्लिपराचीचं गाणं 'Fa9la' मध्ये आपल्या व्हायरल डान्स एन्ट्रीने सर्वांना वेड लावलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dhurandhar Fa9La Dance Step: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याने धूरंधर या चित्रपटात फ्लिपराचीचं गाणं 'Fa9la' मध्ये आपल्या व्हायरल डान्स एन्ट्रीने सर्वांना वेड लावलं आहे. फिल्मिज्ञानसोबतच्या एका मुलाखतीत अक्षयचा सहकलाकार आणि ऑन स्क्रिन भाऊ दानिश पंडोरने सांगितलं, त्यांनी त्या डान्समधील स्टेप्स ठरवून केले नाही. त्याने पुढे सांगितलं, तो डान्स स्क्रिप्टचा भाग नव्हता. अक्षय खन्नाला वाटतं इथं मी एक डान्स करतो आणि त्याने सुरू केलं. 

दानिश म्हणाला, आम्ही हे गाणं लेह लडाखमध्ये शूट केलं होतं आणि विजय गांगुली संपूर्ण गाणं कोरिओग्राफ करीत होते. अक्षयने गाण्यावरील एन्ट्री सीन इम्प्रोवाइज़ केली. ते गाणं आम्ही आधी ऐकलं होतं. तेव्हाच सर्वांना खूप आवडलं होतं. आदित्य सर अक्षय सरांना शॉट समजावून सांगत होते. संपूर्ण कॉरिओग्राफी होत होती आणि त्यादरम्यान अक्षय सरांनी आदित्यला विचारलं, की मी डान्स करू शकतो का? आदित्य सर म्हणाले, जे तुला आवडतं ते कर... 

नक्की वाचा - Dhurandhar: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! पहिल्या वीकेंडची कमाई सर्वांनाच चक्रावणारी

अन् तयार झाला व्हायरल हुक स्टेप..

दानिश पुढे म्हणाला, त्य़ानंतर एक टेक होतो आणि आम्ही सर्वजण एन्ट्री करतो. अक्षय सर सर्वांना डान्स करताना पाहून स्वत:ही डान्स करू लागतात. त्यांना कोणी कोरिओग्राफ केलं नाही. ते पाहून सर्वजण हैराण झाले. शॉटनंतर लोक टाळ्या वाजवू लागले. फ्रेम खूप चांगली लागली होती.. अक्षय सर जबरदस्त आहेत. 

हा डान्स सिक्वेल Fa9la एन्ट्रीचा आहे. जे गाणं बहरीनचे रॅपर फ्लिपराचीने गायलंय. या गाण्यात अक्षय म्हणजेच रहमान डकैतला ISIS सोबत डील करण्यासाठी आपल्या बलूची लोकांशी भेट घेत असल्याचं दाखविण्यात आलंय. ही क्लिप व्हायरल होताच मेकर्सने चित्रपटाचं संपूर्ण गाणं रिलिज केलं. दानिश या चित्रपटात अक्षयचा चुलत भाऊ उजैर बलूचची भूमिका साकारत आहे. 

Advertisement

धुरंधरबद्दल...
आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह भारतीय गुप्तहेर हमजाच्या मुख्य भूमिकेत आहे. सोबतच अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदीदेखील आहेत. चित्रपटाला क्रिटिक्सकडून मिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे.