Dhurandhar Box Office Collection: रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांचा धुरंधर सिनेमा 5 डिसेंबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकलाय. सिनेमा रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर केवळ धुरंधर सिनेमाच्याच चर्चा ऐकायला आहेत. मागील दहा दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे हा सिनेमा चर्चेचा विषय ठरतोय. आता रविवारचे (14 डिसेंबर) सिनेमाचे कलेक्शन पाहिल्यानंतर धुरंधरची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरूच असल्याचं दिसतंय. दुसऱ्या आठवड्यात धुरंधर सिनेमाने 'पुष्पा 2' सिनेमालाही स्पर्धेत मागे टाकलंय. भारतामध्ये सिनेमाने 10 दिवसांत एकूण 350 कोटी रुपयांचा गल्ला कमवलाय.
धुरंधर सिनेमाची 10व्या दिवसाची कमाई | Dhurandhar Box Office Collection Day 10
बॉक्सऑफिस कलेक्शन ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, दहाव्या दिवशी धुरंधर सिनेमाने 59 कोटी रुपयांची कमाई केलीय. भारतामध्ये या सिनेमाने 351.75 कोटी रुपये आणि जगभरात 530.75 कोटी रुपयांची कमाई केलीय. इंडिया ग्रॉसच्या माहितीनुसार, धुरंधर सिनेमाने 420.75 कोटी रुपयांची कमाई केलीय.
(नक्की वाचा: Akshaye Khanna : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमामध्ये खलनायक बनला अभिनयाचा हीरो अक्षय खन्ना, किती मिळालं मानधन? वाचा)
धुरंधर सिनेमाचे नऊ दिवसांचे कलेक्शन
धुरंधर सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई 28 कोटी रुपये | Dhurandhar Box Office Collection Day 1
धुरंधर सिनेमाची दुसऱ्या दिवशीची कमाई 32 कोटी रुपये | Dhurandhar Box Office Collection Day 2
धुरंधर सिनेमाची तिसऱ्या दिवशीची कमाई 43 कोटी रुपये | Dhurandhar Box Office Collection Day 3
धुरंधर सिनेमाची चौथ्या दिवशीची कमाई 23.25 कोटी रुपये | Dhurandhar Box Office Collection Day 4
धुरंधर सिनेमाची पाचव्या दिवशीची कमाई 27 कोटी रुपये | Dhurandhar Box Office Collection Day 5
धुरंधर सिनेमाची सहाव्या दिवशीची कमाई 27 कोटी रुपये | Dhurandhar Box Office Collection Day 6
धुरंधर सिनेमाची सातव्या दिवशीची कमाई 27 कोटी रुपये | Dhurandhar Box Office Collection Day 7
धुरंधर सिनेमाची आठव्या दिवशीची कमाई 32.5 कोटी रुपये | Dhurandhar Box Office Collection Day 8
धुरंधर सिनेमाची नवव्या दिवशीची कमाई 53 कोटी रुपये | Dhurandhar Box Office Collection Day 9
(नक्की वाचा: Akshaye Khanna: विनोद खन्नांची दुसरी पत्नी; Dhurandhar अक्षय खन्नाबद्दल बोलताना म्हणाली, 'मी कधीच आई...')
धुरंधर सिनेमाचे मध्यरात्रीचे शो वाढवले
धुरंधर सिनेमाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता मुंबई आणि पुणे शहरातील थिएटरमध्ये धुरंधर सिनेमाचे मध्यरात्रीचे शो वाढवण्यात आले आहेत. हा सिनेमा एकूण साडेतीन तासांचा आहे.