Dhurandhar सिनेमातील Washma Butt प्रसंगाची इंटरनेटवर तुफान चर्चा, तुम्हाला समजला का अर्थ?

Dhurandhar 'Washma Butt' Meme : रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला  'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाल्यापासून तो सतत चर्चेत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dhurandhar 'Washma Butt' Meme : धुरंधरमधील हा प्रसंग तुमच्या लक्षात आला का?
मुंबई:

Dhurandhar 'Washma Butt' Meme : रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला  'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाल्यापासून तो सतत चर्चेत आहे. आता या चित्रपटातील एका छोट्या सीनमुळे सोशल मीडियावर चांगलीच खमंग चर्चा रंगली आहे. 

या चित्रपटात पाकिस्तानमधील एका बिर्याणी आणि चहाच्या दुकानाचे नाव *वॉश्मा बट' (Washma Butt) असे दाखवण्यात आले आहे. या नावामुळे एक जुना इंटरनेट मीम (Meme) पुन्हा चर्चेत आला असून, प्रेक्षक त्यावर खूप गंमतशीर प्रतिक्रिया देत आहेत.

दिग्दर्शक आदित्य धर याने बनवलेला हा चित्रपट पाकिस्तानमधील ल्यारी भागावर आधारित आहे. यामध्ये दहशतवाद, गुन्हेगारी टोळ्या आणि राजकीय तणाव यांसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. मात्र, चित्रपटाच्या टीमने एका गंभीर दृश्यात एक जुना मीम रेफरन्स देऊन प्रेक्षकांना हसण्याची संधी दिली आहे.

'वॉश्मा बट मीम' आहे तरी काय?

हा 'वॉश्मा बट' मीम काही वर्षांपूर्वी इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. इस्लामाबादमधील 'वॉश्मा बट' नावाच्या एका सोशल मीडिया अकाउंटच्या नावाने ही गंमत सुरू झाली होती. या नावाचा उच्चार इंग्रजीमध्ये 'वॉश माय बट' (Wash my butt) असा होतो, त्यामुळे त्यावर 'वॉश इट युवरसेल्फ' (Wash it yourself) अशा प्रतिक्रिया दिल्या जात असत. हळूहळू, अशा प्रकारची अनेक मीम्स व्हायरल झाली. 2019 मध्ये '9गॅग'वर हे नाव खरे आहे की नाही, यावर चर्चा झाली होती. तेव्हा एका व्यक्तीने स्पष्ट केले होते की, 'बट' हे पाकिस्तानातील एक खरे आडनाव आहे, पण 'वॉश्मा' हे नाव खरे नाही.

Advertisement

'धुरंधर'मध्ये मीमचा वापर कसा झाला?

'धुरंधर'मधील एका महत्त्वाच्या सीनमध्ये, रणवीर सिंगचा 'हमजा अली माझारी' हा पात्र पहिल्यांदा ल्यारीमध्ये पोहोचतो. तो गौरव गेराच्या भूमिकेतील 'मोहम्मद आलम' याच्या बिर्याणी आणि चहाच्या दुकानात जातो. कॅमेरा दुकानाच्या नावाकडे जातो, जिथे 'वॉश्मा बट' असे नाव दिसते. या सीनच्या आसपासचे वातावरण गंभीर असले तरी, इंटरनेटवरच्या वाचकांनी ही गंमत लगेच हेरली.

या नावाचा थेट संबंध इस्लामाबादमधील त्या रहिवासी व्यक्तीशी जोडला जात आहे, जी इंटरनेट ट्रोलिंगचा विषय बनली होती. चित्रपटात हे दुकान काही सेकंदांसाठीच दिसत असले तरी, चित्रपट निर्मात्यांनी हे संदर्भ वापरल्याबद्दल सोशल मीडियावर आश्चर्य, विनोद आणि पाकिस्तानचे ट्रोलिंग करण्यात येत आहे.


(नक्की वाचा : कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या )
 

Topics mentioned in this article