Dhurandhar: धुरंधर सिनेमात दाखवलेला उजैर बलोच नक्की कोण?'तो' जुना इंटरव्ह्यू पाहून उडेल थरकाप, पाहा Video

Dhurandhar Movie: Who is Uzair Baloch? धुरंधर सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असतानाच त्यातील पात्रांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dhurandhar Movie: जैरचा 2012 मधील एक जुना इंटरव्ह्यू पुन्हा एकदा समोर आला असून तो पाहून कुणाच्याही अंगावर शहारे येतील.
मुंबई:

Dhurandhar Movie: Who is Uzair Baloch?  धुरंधर सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असतानाच त्यातील पात्रांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेलं उजैर बलोच हे पात्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. 

उजैर बलोच हा रहमान डकैतचा जवळचा नातेवाईक होता आणि कराचीमधील ल्यारी भागात त्याची मोठी दहशत होती. धुरंधर सिनेमात अभिनेता डेनिश पंडोर यानं उजैरची भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या निमित्तानं उजैरचा 2012 मधील एक जुना इंटरव्ह्यू पुन्हा एकदा समोर आला असून तो पाहून कुणाच्याही अंगावर शहारे येतील.

अलिशान आयुष्य आणि लोकांची गरिबी

कराचीमधील ल्यारी हा भाग वर्षानुवर्षे गँगवॉर, गरिबी आणि उपेक्षेसाठी ओळखला जातो. तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि रोजगारासाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र याच भागात उजैर बलोच अतिशय विलासी जीवन जगत होता. त्यानं खंडणी आणि ड्रग्सच्या व्यवसायातून मोठी माया जमवली होती.

( नक्की वाचा : Dhurandhar: रहमत डकैतचा अंत सिनेमात दाखवला तसाच झाला होता का? वाचा 'Reel vs Real' स्टोरी )
 

ल्यारीमध्ये उजैरनं एक चार मजली आलिशान बंगला बांधला होता, ज्यामध्ये स्वतःचा स्विमिंग पूलही होता. एकीकडे आजूबाजूचे लोक थेंब थेंब पाण्यासाठी तरसत असताना उजैरच्या घरात पाण्याचा अपव्यय सुरू होता. हाच विरोधाभास पत्रकार नूर-उल-अरिफीन यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे दिसून आला होता.

Advertisement

 उजैरची धक्कादायक मुलाखत

त्या जुन्या मुलाखतीमध्ये जेव्हा पत्रकाराने उजैरला त्याच्या उत्पन्नाच्या साधनाबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला होता की, तो एक ट्रान्सपोर्टर आणि जमिनीचा मालक आहे, तसेच दुबईमध्ये त्याचा बिझनेस आहे. जेव्हा पत्रकाराने त्याला त्याच्या घरातील वॉटर काउंटर आणि भागातील पाण्याची टंचाई याबद्दल विचारले, तेव्हा त्याने अतिशय निर्लज्जपणे उत्तर दिले होते. 

अल्लाहने मला या सर्व गोष्टी दिल्या आहेत आणि मी त्या लोकांसाठी वापरतो, असे त्याने सांगितले होते. त्याने पत्रकाराला स्वतःसोबत येण्याचे आव्हान देत लोक माझ्यावर किती प्रेम करतात हे बघा, असेही म्हटले होते.

Advertisement

(नक्की वाचा : Akshaye Khanna: विनोद खन्नांची दुसरी पत्नी; Dhurandhar अक्षय खन्नाबद्दल बोलताना म्हणाली, 'मी कधीच आई...' )

स्वतःला डॉन म्हणवून घेण्याची पद्धत

उजैर बलोचवर हत्येचे अनेक गंभीर आरोप होते, पण तो स्वतःला जनसेवक मानत असे. इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा त्याला डॉन संबोधण्यात आले, तेव्हा त्याने हे जनतेच्या सेवेचे फळ असल्याचे म्हटले. त्याने दावा केला होता की, त्याने साध्या मुंगीलाही मारलेले नाही. 

बेरोजगारीच्या विरोधात आवाज उठवणे आणि लोकांची मदत करणे जर गुन्हा असेल, तर मला कातिल म्हणा, असे त्याचे म्हणणे होते. प्रत्यक्षात मात्र उजैर हा कराचीमधील सर्वात धोकादायक गँगस्टरपैकी एक होता. त्याचा मोठा भाऊ रहमान डकैत याच्या मृत्यूनंतर त्याने संपूर्ण गँगची सूत्रे हातात घेतली होती आणि अनेक क्रूर हत्यांमध्ये त्याचा सहभाग होता.

Advertisement

( नक्की वाचा : Dhurandhar सिनेमातील Washma Butt प्रसंगाची इंटरनेटवर तुफान चर्चा, तुम्हाला समजला का अर्थ? )
 

अटक आणि कोर्टाचा निकाल

उजैरवर 2014 पर्यंत 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले होते, त्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता. 2015 मध्ये त्याला दुबईतून अटक करून पाकिस्तानात आणण्यात आले. 2020 मध्ये त्याला 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. अलीकडेच 2012 मधील एका शस्त्रास्त्र प्रकरणात पुराव्याअभावी त्याची सुटका झाली असली, तरी इतर अनेक प्रकरणांत तो अजूनही जेलमध्येच आहे. 

आदित्य धर यांच्या धुरंधर सिनेमात उजैरची एन्ट्री ज्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. सिनेमाचा शेवट उजैरच्या पात्रावर होतो, जो नकळतपणे आपल्या भावाच्या हत्याऱ्याला मिठी मारतो.

इथे पाहा मुलाखतीचा VIDEO

Topics mentioned in this article