गायक संजू राठोड सध्या त्याच्या करिअरचा सुवर्णकाळ अनुभवत आहे. ज्या गाण्याला तो हात लावतो, ते सुपरहिट होत आहे. काली बिंदी... , गुलाबी साडी... , शेकी शेकी... आणि सुंदरी सुंदरी... गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळली आहे. सुंदरी हे गाणं रिलीज झाल्यानंतर लगेचच यूट्युबवर ट्रेंडिंगमध्ये आलं होतं.
मात्र या गाण्याची सुरुवातीची म्युझिक कुठे ऐकल्यासारखी वाटतेय का? असा सवाल रोनित महाले या इन्स्टाग्राम युजरने केला आहे. रोनितने त्याच्या @7ronniet या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक रील शेअर केला आहे. त्यात त्याने सुंदरी गाण्याची सुरुवात कॉपी असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्याने सुंदरी गाण्यासोबत आणखी एक ट्युन ऐकवली आहे.
जॉन सीनाची एन्टी थीम
सुंदरी गाण्याची सुरुवात WWE सुपरस्टार जॉन सीनाच्या एन्ट्री थीम ट्युन सारखी असल्याचा दावा रोनिन केला आहे. दोन्ही म्युझिकची तुलना करताना त्याने संजू राठोडला टॅग करत 'बरोबर ना?' असा सवाल देखील केला आहे.
(नक्की वाचा- Sundari Song Lyrics: सुंदरी गाण्यातील 'टक टक देखरो'चा अर्थ माहिती आहे का ? संजू राठोडचं गाणं सुपरहिट झालं)
रोनिन महालेचा प्रयत्न फसला
रोनिन महालेन संजू राठोडवर म्युझिक कॉपी करण्याचा केलेला आरोप त्याच्यावरच उलटल्याचं दिसून आलं. कारण त्याच्या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या. मात्र कुणीच त्याच्या पोस्टशी सहमत नसल्याचं दिसून आलं. दोन्ही म्युझिक वेगवेगळ्या असल्याचं सर्वाचं म्हणणं होतं.
युजर्सच्या कमेट्स
एका युजरने कमेंट केली की, "कोणत्याही संगीतकाराला विचारलं, तो सांगेल ही म्युझिक कॉपी नाही." आणखी एकाने लिहिलं की, "जा रे, संजू राठोडवर जळू नको." आणखी एकाने लिहिलं की, "काहीच मॅच होत नाहीय. कुणी एवढं चुकीचं कसं असू शकतं?" रोनिनने संजू राठोडवर म्युझिक चोरीचे आरोप केले, मात्र संजूने स्पष्टीकरण देण्याआधीच त्याच्या चाहत्यांनी हा विषय संपवलं आहे. त्यामुळे @7ronniet या युजरला हा प्रयत्न फसला असंच म्हणावं लागेल.