अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडचा शेवटचा सुपरस्टार मानला जातो. ऋषी कपूर-दिव्या भारती यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'बोल राधा बोल' या सिनेमातून शाहरुख खाननं हिंदी चित्रपटसृष्टीतून पदार्पण केलं. या सिनेमात मध्यंतरानंतर शाहरुखची एन्ट्री होती. छोट्याश्या भूमिकेतून त्यानं फॅन्सचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर जुही चावलासोबत प्रदर्शित झालेल्या 'राजू बन गया जंटलमन' सिनेमात शाहरुख मुख्य भूमिकेत होता. या दोन सिनेमाच्या यशानंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीतून मुंबईत आलेल्या शाहरुखचा बॉलिवूडमध्ये प्रवेश सहज झाला नाही. दिवाना प्रदर्शित होण्यापूर्वी त्यानं फौजी, सर्कस या हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं, हे सर्वांना माहिती आहे. पण, त्यानं 'दिवाना'पूर्वीही एका सिनेमात काम केलं होतं, हे अनेकांना माहिती नाही.
शाहरुखनं केली होती Gay ची भूमिका
शाहरुख खाननं हिंदी नाही तर इंग्रजी सिनेमामध्ये काम केलं होतं. 1989 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा टेलिव्हिजनसाठी बनवलेला होता. तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला नाही. 'इन व्हिच अॅनी गिव्स इट दोज वन्स' (In Which Annie Gives It Those One) असं या सिनेमाचं होते बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय (Arundhati Roy) यांनी या सिनेमाच्या लेखिका होत्या.
(नक्की वाचा : Kandahar Hijacking : 'इस्लाम कबूल करा', कंदहार अपहरणातील पीडित महिलेनं उघड केली अनेक रहस्यं )
हा सिनेमा आदर्शवादी विद्यार्थी आनंद ग्रोव्हर/अॅनी (अर्जुन रैना) च्या आयुष्यावर अधारित होती. अरुंधती रॉय यांनीही या सिनेमात आनंदच्या गर्लफ्रेंडचा रोल केला होता. या चित्रपटाक रोशन सेठ, ऋतूराज सिंह यांचीही भूमिका होती. अरुंधती रॉयचे माजी पती प्रदीप किशन यांनी हा सिमेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
शाहरुख खान या सिनेमात पाहुणा कलाकार होता. त्यानं यामध्ये समलैंगिक व्यक्तीची (Gay) भूमिका केली होती. शाहरुखनं तीन दशकांपेक्षा जास्त कारकिर्दीमध्ये समलैंगिक व्यक्तीची केलेली ही एकमेव भूमिका आहे. त्यानंतर त्यानं कधीही या प्रकारची भूमिका केली नाही. शाहरुख खान प्रमाणेच चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अभिनेता मनोज बाजपेयीचीही या सिनेमात पाहुणा कलाकार होता. शाहरुख आणि मनोज बाजपेयी या दोघांचाही त्या काळात इंडस्ट्रीमध्ये 'स्ट्रगल' सुरु होता. त्यामुळेच त्यांनी कदाचित या सिनेमात कमी लांबीची भूमिका केली असावी