जाहिरात

Kandahar Hijacking : 'इस्लाम कबूल करा', कंदहार अपहरणातील पीडित महिलेनं उघड केली अनेक रहस्यं

IC 814 The Kandahar Hijack : कंदहार विमान अपहरण घटनेवर आधारित असलेली IC 814 कंदहार हायजॅक अपहरणातील पीडित महिला प्रवाशांनी 25 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

Kandahar Hijacking : 'इस्लाम कबूल करा', कंदहार अपहरणातील पीडित महिलेनं उघड केली अनेक रहस्यं
मुंबई:

IC 814 The Kandahar Hijack : कंदहार विमान अपहरण घटनेवर आधारित असलेली IC 814 कंदहार हायजॅक (Netflix series IC 814: The Kandahar Hijack) ही नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज सध्या वादामध्ये सापडली आहे. या वेब सीरिजमध्ये मुस्लीम दहशतवाद्यांची नावं हिंदू दाखवण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. केंद्रीय माहिती आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं याबाबत नाराजी व्यक्त करत नेटफ्लिक्सला समज दिली. त्यानंतर नेटफ्लिक्सनं मालिकेच्या सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या सूचनेमध्ये दहशतवाद्यांची खरी आणि काल्पनिक नावं दाखवण्याचा निर्णय घेतला.

या वेब सीरिजमुळे 1999 साली घडलेल्या त्या घटनेची पुन्हा एकदा देशात चर्चा सुरु झाली आहे. विमान अपहरणाची प्रत्यक्ष वेदना अनुभवणाऱ्या प्रवाशांच्या जखमेची खपली निघाली आहे. या अपहरणातील पीडित महिला पूजा कटारिया यांनी या अपहरणात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची रहस्यं उघड केली आहेत. त्याचबरोबर नेटफ्लिक्सच्या वेब सीरिजबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हनीमूनहून परतत असताना अपहरण

पूजा कटारिया नेपाळला हनीमूनसाठी गेल्या होत्या. हनीमूनहून परतत असताना त्यांच्या विमानाचं अपहरण झालं. त्यांना त्या दिवशीच दिल्लीमध्ये परतायचं होतं, पण विमान अपहरण झाल्यानं तब्बल आठ दिवसांनी त्या घरी परतल्या. आपण 'हायजॅक' हे नाव कधी ऐकलंही नव्हतं. आतमध्ये काय सुरु आहे हे आम्हाला समजत नव्हतं, असं पूजा कटारिया यांनी सांगितलं. 

विमानात पाच दहशतवादी होते. विमानाचं उड्डाण झाल्यानंतर अर्ध्या तासांनीच दहशतवाद्यांनी ते हायजॅक झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर जे घडलंय ते नेटफ्लिक्समधील सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. विमानातील लोकं खूप घाबरले होते. त्यांना सतत पॅनिक अटॅक येत होते. आपण कुठं आहोत हे कुणालाही माहिती नव्हतं. भारतामध्ये परतल्यानंतरच आम्ही आठ दिवस कंदहारमध्ये होतो हे समजलं, असं पूजा यांनी सांगितलं.

( IC 814 Hijack : प्रवाशांसोबत अंताक्षरी ते दहशतवाद्याकडून माफी, अनुभव सिन्हाच्या वेब सीरिजमध्ये काय आहे? )
 

'इस्लाम कबूल करा'

आम्हाला खाण्यासाठी फक्क एक छोटं सफरचंद मिळालं होतं, असं पूजा यांनी सांगितलं. पहिले दोन दिवस प्रचंड तणावाचे होते. आम्हाला मान खाली करायला (हेड्स डाऊन) लावली होती. दहशतवाद्यांमधील बर्गर लोकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. तो लोकांना अंताक्षरी खेळायला लावत असे. त्यापैकी जो डॉक्टर होता तो इस्लाम धर्म स्वीकारा. इस्लाम खूप चांगला धर्म आहे, असं आम्हाला सांगत असे. तो त्यावर प्रवचन देत असे,  अशी माहितीही पूजा यांनी दिली.

भोला आणि शंकरचं सत्य काय?

नेटफ्लिक्समधील बेव सीरिजमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणेच दहशतवाद्यांची भोला आणि शंकर नाव होते. ते एकमेकांना याच नावानं हाक मारत होते. ते कदाचित त्यांची कोडनेम असावीत. आम्ही ही नावं ऐकली होती, असं पूजा यांनी सांगितलं. मला ही सीरिज पहिल्या भागानंतर सुरुवातीला पाहवली नाही. त्यानंतर मी निर्धारानं पाहिली. जे घडलंय ते त्यामध्ये दाखवलं आहे. याकडं मनोरंजन म्हणून पाहावं, असं आवाहनही पूजा कटारिया यांनी केलं. 

( उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशाह भडकला, 30 सरकारी अधिकाऱ्यांना दिली फाशी )
 

सरकारचं अपयश 

अपहरण करण्यात आलेलं विमान अमृतसरमध्ये रोखायला हवं होतं. कमांडो कारवाई करुन प्रवाशांची सूटका करायला हवी होती. या कारवाईत किती प्रवाशांचा जीव गेला असता हे माहिती नाही, पण मसूद अझर सारख्या दहशतवाद्याला सोडायला नको होतं, अशी भावना पूजा यांनी ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केली. दहशतवाद्यांना सोडणं हे सरकारचं अपयश होतं, असं पूजा यावेळी म्हणाल्या. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
चित्रपटाच्या पोस्टरवर झळकले राज ठाकरे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी प्रदर्शित होणार चित्रपट
Kandahar Hijacking : 'इस्लाम कबूल करा', कंदहार अपहरणातील पीडित महिलेनं उघड केली अनेक रहस्यं
renuka-swamy-murder-case-chargesheet-kannad-superstar-darshan-details
Next Article
Renukaswamy Murder : सुपरस्टार बनला व्हिलन, 'प्रायव्हेट पार्ट' ला विजेचे झटके देऊन केली फॅनची हत्या