Mithun Chakraborty Daughter Dishani Chakraborty : मिथून चक्रवर्ती यांनी त्यांचा काळ गाजवलाय. त्यांना डिस्को किंग नावानेही ओळखलं जातं. तीन राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मिथून चक्रवर्ती यांनी ३५० चित्रपटात काम केलं आहे. व्यावसायिक आयुष्याशिवाय मिथून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या एका मुलीबद्दल सांगणार आहोत. या मुलीला मिथूनदा यांनी दत्तक घेतलं होतं.
मिथून चक्रवर्ती यांना चार मुलं आहेत. मिमोह, नमाशी, उष्मे आणि दिशानी चक्रवर्ती. दिशानी ही मिथून यांनी बायोलॉजिकल मुलगी नाही. त्यांनी दिशानीला दत्तक घेतयं. दिशानीचा जन्म कोलकातामध्ये झाला होता आणि जन्मानंतर तिचे आई-वडील तिला सोडून निघून गेलेय एका प्रमुख बंगाली वृत्तपत्राच्या बातमीनुसार, या मुलीला कचऱ्याच्या पेटीजवळ सोडून देण्यात आलं होतं. मात्र एका पादचाऱ्याने मुलीला ताब्यात घेलतं. दुसऱ्या दिवशी ही बातमी वृत्तपत्रात आली. यानंतर मिथूनदा तातडीने त्या मुलीला भेटायला गेले. यानंतर त्यांनी मुलीला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली.
मिथून चक्रवर्तीच्या या कामात त्यांच्या पत्नीनेही साथ दिली. कायदेशीर कारवाई पूर्ण केल्यानंतर ते मुलीला घरी घेऊन आले.
दिशानी मिथूनची सर्वात लाडकी...
मुलीला घरी आणल्यानंतर मिथुनने तिचं नाव दिशानी ठेवलं आणि सख्ख्या मुलीसारखं प्रेम दिलं. दिशानी नेहमीच मिथून यांची लाडकी आहे. मिथुन तिची सर्व इच्छा पूर्ण करतात. तीदेखील प्रत्येक गोष्ट वडिलांसोबत शेअर करते. वडिलांप्रमाणे दिशानीनेही अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं आणि यानंतर अभिनयाचा कोर्स केला.
दिशानीने भारतात आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी ती अमेरिकेच्या लॉस एजिल्समध्ये गेली. दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमधून अभिनयात पदवी घेतली. २०१७ मध्ये हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शॉर्ट फिल्ममधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दिशानी एका परदेशी तरुणाला डेट करतेय, त्याचं नाव माइल्स मंट्जारिस आहे. यापूर्वी ती हॉलिवूडचा अभिनेता कोडी सुलेक याला डेट करीत होती.