जाहिरात

Divya Bharti Sister: दिव्या भारतीच्या सुंदर बहिणीचे 10 फोटो, अभिनेता संजय दत्तने दिला होता हा सल्ला

Divya Bharti Sister: दिव्या भारतीच्या बहिणीने वर्ष 2013मध्ये रिलीज झालेल्या कॉमेडी सिनेमाद्वारे प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होते.

Divya Bharti Sister: दिव्या भारतीच्या सुंदर बहिणीचे 10 फोटो, अभिनेता संजय दत्तने दिला होता हा सल्ला
दिव्या भारतीच्या बहिणीचे 10 सुंदर फोटो

Divya Bharti Sister: 90च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने कित्येक सुपरहिट सिनेमे देणारी अभिनेत्री दिव्या भारती भलेही आज या जगात नसेल. पण बहीण कायनात अरोरामुळे तिच्या आठवणी कायम जिवंत होतात. कायनात देखील बहीण दिव्या भारतीप्रमाणे सुंदर आहे आणि तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. दिव्या भारती हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे, पण कायनातला बहिणीप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. कित्येक मोठ्या बॅनरच्या सिनेमांमध्ये कायनात झळकलीय, तरीही कायनात प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवू शकली नाही. कायनात अरोराबाबत माहिती जाणून घेऊया... 

Latest and Breaking News on NDTV

कायनात अरोराला या सिनेमाद्वारे मिळाली ओळख

38 वर्षीय कायनात अरोराचा जन्म उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे झाला आहे. अभिनेत्रीचे खरे नाव चारू अरोरा असे आहे, पण बॉलिवूडच्या दुनियेत ती कायनात या नावाने ओळखली जाते.  

Latest and Breaking News on NDTV

कायनातने मॉडेलिंग क्षेत्राद्वारे करिअरची सुरुवात केली होती. वर्ष 2010मध्ये अक्षय कुमार आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांची मुख्य भूमिका असलेला खट्टा-मीठा सिनेमाद्वारे तिने पदार्पण केले होते. सिनेमातील 'आइला रे आइला' आयटम नंबरमध्ये ती झळकली होती.  

Latest and Breaking News on NDTV

कायनातने कॉमेडी सिनेमा "ग्रँड मस्ती" मध्ये मिस मार्लो हे पात्र साकारलं होतं आणि याच सिनेमाद्वारे तिला प्रसिद्धी मिळाली होती. सिनेमातील तिचे पात्र आकर्षक होते. कायनातला गायनाचीही आवड आहे, मल्याळम भाषिक सिनेमामध्ये तिने कित्येक गाणी गायली आहेत.  

Latest and Breaking News on NDTV

याव्यतिरिक्त कायनात सोशल मीडियावरही सक्रिय असते. स्वतःचे सुंदर आणि आकर्षक लुकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या 4.4 मिलियन इतकी आहे.

(नक्की वाचा: Pooja Bhatt Husband Photos: पूजा भटचा पती कोण आहे? काय करतो? पाहिले का त्याचे हे 10 फोटो)

Latest and Breaking News on NDTV

कायनातने 'खट्टा-मीठा', 'मनकथा', 'ग्रँड मस्ती', 'खूबसूरत', 'लैला ओ लैला', 'मोगली पुवु', 'फरार', 'किट्टी पार्टी', 'टिप्सी' आणि 'इश्क पश्मीना' या सिनेमांमध्ये काम केलंय. 

Latest and Breaking News on NDTV

वर्ष 2022नंतर ती एकाही सिनेमामध्ये दिसली नाही. कायनात ही दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीची चुलत बहीण आहे.  

(नक्की वाचा: Priya Bapat Andhera Web Series: कदमला दिलेली केस बंद होणार? प्रिया बापट दिसणार दमदार लेडी सिंघमच्या भूमिकेत)

Latest and Breaking News on NDTV

नुकतेच IANS वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की,'जर दिव्या माझी चुलत बहीण नसती तर कदाचित माझे करिअर चांगले झाले असते.' पुढे ती असंही म्हणाली की, "तरीही मी तिची सर्वात मोठी चाहती आहे". 

Latest and Breaking News on NDTV

संजय दत्तने दिला होता हा सल्ला 

कायनातने मुलाखतीत असेही सांगितलं होतं की, संजय दत्त आणि साउथ सुपरस्टार अजीत कुमारने तिला सिनेसृष्टी सोडण्याचा सल्ला दिला होता. अजितने मला म्हटलं की कायनात तू खूपच साधी आहेस. तुला पूर्णपणे तयार व्हावं लागेल, कारण हा प्रवास सोपा नाहीय. कायनातने केलेल्या दाव्यानुसार संजय दत्तनेही करिअरच्या सुरुवातीस हाच सल्ला दिला होता.  

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com