Surabhi Show News: आज सोशल मीडियाच्या युगात, एखाद्या शोची लोकप्रियता लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्सवरून मोजली जाते. कोणत्या कलाकाराचे किती फॉलोअर्स? किती लाईक्स मिळाले? किती व्हिव्ज्यू आले? यावरुन त्या कार्यक्रमाची लोकप्रियता मोजली जाते. मात्र 90 च्या दशकात प्रेक्षक आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी थेट पत्र पाठवायचे. असाच एक कार्यक्रम 90 च्या दशकात प्रचंड गाजला होता, ज्याची लोकप्रियता इतकी होती की तब्बल 14 लाख पत्रे आली होती.
Rajpal Yadav: राजपाल यादववर भडकले न्यायाधीश! सुनावले खडे बोल, म्हणाले 'नो मीन्स नो'
90 च्या दशकात सुरभीने लावलेलं वेड
90 च्या दशकात प्रेक्षक एखाद्या कार्यक्रमाबद्दल, कलाकाराबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी थेट पत्र लिहायचे. तेव्हा प्रेक्षकांचे प्रेम कागदावर उतरवले जायचे आणि पोस्टकार्डच्या माध्यमातून टीव्हीपर्यंत पोहोचायचे. आपल्या आवडत्या शोमध्ये आपला समावेश व्हावा यासाठी लोक उत्साहाने पत्रे पाठवत असत. त्याच काळात एक असा शो उदयास आला, ज्याने प्रेक्षकांच्या प्रचंड लोकप्रियतेचा एक विक्रम रचला, जो आजही स्मरणात आहे. हा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांनी होस्ट केलेला 'सुरभी'.
एका मुलाखतीत सिद्धार्थ काक यांनी सांगितले की, सुरुवातीला या शोला माफक प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या काही महिन्यांत फक्त १० ते २०० पत्रे येत होती, पण हळूहळू ही संख्या झपाट्याने वाढू लागली. थोड्याच काळात परिस्थिती अशी झाली की, दर आठवड्याला जवळपास ५,००० पोस्टकार्ड येऊ लागली. टीमला प्रत्येक पत्र वाचणे कठीण झाले होते. यानंतर, प्रेक्षकांना फक्त एकच पोस्टकार्ड पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. पण प्रेक्षकांचे प्रेम थांबवता आले नाही. एका आठवड्यात जवळपास १४ लाख पोस्टकार्ड वितरित करून एक विक्रम प्रस्थापित झाला.
विक्रम झाला, दर वाढवावे लागले..
पत्रांच्या या प्रचंड ओघामुळे, शोच्या नावाचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळी एका पोस्टकार्डची किंमत सुमारे १५ पैसे होती, जी सरकारकडून अनुदानित होती. तथापि, जेव्हा पोस्टकार्डची मागणी अचानक वाढली, तेव्हा दर वाढवावे लागले. परिस्थिती इतकी बिकट झाली की पोस्ट ऑफिसमध्ये पत्रे ठेवण्यासाठी जागाच उरली नाही. अंधेरी पोस्ट ऑफिसमधून फोन आला की पत्रे हाताळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. परिणामी शोच्या टीमला पत्रे पोहोचवण्यासाठी टेम्पोचा वापर करावा लागला. शेकडो पिशव्या केवळ पोस्टकार्डनेच भरल्या होत्या.