टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 25 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका नव्या रुपात पुन्हा प्रदर्शित होत आहे. क्योंकिची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे स्मृती इराणी (Smriti Irani) पुन्हा एकदा तुलसीची भूमिका साकारणार आहे. आता मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्मृती इराणीचा पहिला लुक समोर आला आहे. या प्रोमोसह मालिका ऑनएअर कधी होणार, त्याची तारीख आणि वेळही सांगण्यात आली आहे. (ekta kapoor)
2000 ते 2008 पर्यंत तब्बल आठ वर्षे स्टार प्लसवर राज्य केलेली मालिका क्योंकि सास भी कभी बहू थीची दमदार वापसी होत आहे. या मालिकेत तुलसी आणि मिहीर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. सुरुवातीला ही मालिका जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार होती. मात्र एकता कपूरला काही गोष्टी परफेक्ट हव्या होत्या, यासाठी अमर उपाध्यायने सांगितलं की, मालिका यायला वेळ लागले. मात्र आता प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये स्मृती इराणी तुलसीच्या (Smriti Irani as a Tulsi) भूमिकेत दिसत आहेत. मालिकेची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये तुलसी तुळशीला पाणी घालताना दिसत आहे. टीव्हीवर परत येणार कारण प्रेक्षकांसह 25 वर्षे जुनं नातं आहे, असं स्मृती इराणी या प्रोमोमध्ये म्हणताना दिसते.
Photo Credit: Smriti irani
21 दिवसांनंतर मालिका पोहोचणार घराघरांत...
ही मालिका 21 दिवसांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका 29 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता स्टार प्लस आणि जिओ हॉटस्टारवर घरबसल्या पाहता येईल. मालिकेच्या वेळेबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. ही वेळ उशीरा असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.