Netflix trending Web Series and Movies: दिवाळीचा (Diwali) सणासुदीचा उत्साह आणि त्याला जोडून आलेला वीकेंड (Weekend) म्हणजे घरात राहून कुटुंबासोबत मनोरंजन (Entertainment) करण्याची सुवर्णसंधीच! ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) सध्या अनेक लेटेस्ट चित्रपट आणि वेब सीरिज (Web Series) ट्रेंडिंगमध्ये आहेत. या दिवाळी वीकेंडला 'बिंज वॉच' (Binge Watch) करण्यासाठी नेटफ्लिक्सवर (Netflix) सध्या गाजत असलेल्या टॉप ५ चित्रपट आणि सीरिजची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या यादीत अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgan) चित्रपटापासून ते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) दिग्दर्शनाखालील वेब सीरिजचा समावेश आहे.
१. द बॅड्स ऑफ बॉलीवूड (The Bads Of Bollywood): शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शित केलेली ही वेब सीरिज सध्या वीकेंडसाठी एक परफेक्ट चॉईस ठरत आहे. या सीरिजमध्ये बॉलीवूडचे 'डार्क सिक्रेट्स' विनोदी पद्धतीने (Dark Secrets shown humorously) दाखवण्यात आले आहेत. राघव जुयाल, लक्ष्य लालवानी, आन्या सिंह, साहेर बाम्बा, मोना सिंह, बॉबी देओल, गौतमी कपूर आणि मनोज पाहवा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे, सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांसारख्या सुपरस्टार्सनीही यात कॅमिओ (Cameo) केला आहे.
२. धडक २ (Dhadak 2): सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांची ही रोमान्टिक थ्रिलर (Romantic Thriller) फिल्म नेटफ्लिक्सवर चांगलीच ट्रेंड करत आहे. यात तुम्हाला प्रेमकथेसोबतच क्राईम सीन्स (Crime Scenes) चाही थरार अनुभवायला मिळेल. शाजिया इक्बाल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सिद्धांत आणि तृप्ती यांच्यासोबत सौरभ सचदेवा देखील मुख्य भूमिकेत आहेत.
Bill Gates: अब्जाधीश बिल गेट्स यांची हिंदी मालिकेत एन्ट्री! भाजपच्या महिला नेत्यासोबत करणार काम
३. ॲलिस इन बॉर्डरलाईंड (Alice in Borderland): हा थ्रिलर ड्रामा वेब सीरिज देखील भारतात नेटफ्लिक्सवर चर्चेत आहे. यात ॲक्शन (Action) आणि थ्रिलरचा जबरदस्त अनुभव मिळेल. वीकेंडला घरात बसून बिंज वॉच करण्यासाठी ही सीरिज सर्वोत्तम मानली जात आहे. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन रिलीज झाले असून, तिन्ही सीझनमध्ये एकूण २२ एपिसोड्स (Episodes) आहेत.
४. सन ऑफ सरदार २ (Son Of Sardaar 2): अभिनेता अजय देवगणची ही कॉमेडी फिल्म (Comedy Movie) देखील दिवाळी वीकेंडला कुटुंबासोबत पाहण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यात अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर, संजय मिश्रा, रवी किशन, दीपक डोबरियाल, नीरू बाजवा आणि कुब्रा सैत हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. विजय कुमार अरोरा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात तुम्हाला प्रत्येक वळणावर हशा आणि विनोदाचा 'डोस' मिळेल.
Asrani Last Wish: 'मेरी मौत के बाद...' असरानी यांची शेवटची इच्छा... कुटुंबीयांनी केली शांतपणे पूर्ण
५. महावतार नरसिंम्हा: अश्विन कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा ॲक्शन ॲनिमेटेड चित्रपट (Action Animated Film) थिएटरमध्ये यशस्वी ठरल्यानंतर ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. यामध्ये भगवान विष्णूच्या वराह (Varaha) आणि नरसिंह (Narsimha) अवताराबद्दल माहिती दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा पहिला ॲनिमेटेड चित्रपट ठरला आहे आणि सध्या तो नेटफ्लिक्सवर भारतात ट्रेंड करत आहे.