
Bill Gates in Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: हिंदी मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात प्रभावी उद्योगपतींपैकी एक असलेले बिल गेट्स (Bill Gates) आता भारतीय टेलिव्हिजनवर (Indian Television) दिसणार आहेत. होय, ऐकायला थोडे विचित्र वाटत असले तरी हे सत्य आहे. भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या आगामी 'क्योंकी सास भी कभी बहू थी २' (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2) या मालिकेत बिल गेट्स 'कॅमिओ' (Cameo) करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिल गेट्स केवळ एका क्षणासाठी झळकणार नाहीत, तर ते मालिकेच्या तीन एपिसोड्समध्ये (Three Episodes) दिसणार आहेत. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेत एक असा भावनिक वळण (Twist) येणार आहे, जिथे स्मृती इराणी आणि बिल गेट्स हे व्हिडिओ कॉलवर (Video Call) संवाद साधताना दिसतील. ही चर्चा केवळ सामान्य गप्पांची नसेल, तर त्यामागे एक गंभीर सामाजिक संदेश (Social Message) दडलेला असेल.
Asrani Last Wish: 'मेरी मौत के बाद...' असरानी यांची शेवटची इच्छा... कुटुंबीयांनी केली शांतपणे पूर्ण
बिल गेट्स यांची हिंदी मालिकेत एन्ट्री
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन' (Bill & Melinda Gates Foundation) ही संस्था बऱ्याच काळापासून नवजात शिशूंच्या मृत्यू दरात (Neonatal Mortality Rate) घट करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी (Child Health) काम करत आहे. नेमका हाच विचार 'क्योंकी सास भी कभी बहू थी २' या मालिकेतही गुंफण्यात आला आहे.
शोचे निर्माते आणि स्मृती इराणी यांची इच्छा आहे की ही मालिका केवळ मनोरंजनापुरती (Entertainment) मर्यादित न राहता, समाजात जागरूकता (Awareness) निर्माण करण्याचे माध्यम बनावी. मालिकेशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, "आम्ही गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर आधारित एक 'ट्रॅक' (Track) शूट केला आहे. लोकांना या विषयांबद्दल जागरूक कसे व्हावे, हे दाखवले जाईल.
शाहरुखच्या'मन्नत'वर नाही झाली दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन' खऱ्या जगात याच दिशेने काम करत असल्याने, आम्ही त्यांच्याशी जोडून हे एपिसोड तयार केले आहेत." स्मृती इराणी स्वतः या मालिकेद्वारे सामाजिक मुद्द्यांवर चर्चा व्हावी, यासाठी उत्सुक होत्या, जेणेकरून प्रेक्षक मनोरंजनासोबत काहीतरी शिकू शकतील. जसे 'क्योंकी सास भी कभी बहू थी' नेहमी महिलांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या दाखवत आले आहे, त्याचप्रमाणे आता हे एपिसोड त्यांना अधिक गांभीर्याने सामाजिक मुद्द्यांशी जोडण्याचा प्रयत्न करतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world