Thalapathy Vijay Son: थलपती विजय यांच्या मुलाचे 5 फोटो, वडिलांची कार्बन कॉपी; या भूमिकेत गाजवणार सिनेसृष्टी?

Thalapathy Vijay Son: सुपरस्टार थलपती विजय यांचा मुलगा जेसन संजय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जेसनचा लुक, त्याचे दिग्दर्शनातील पदार्पण आणि वडिलांसोबतच्या नात्याबद्दलच्या चर्चा सविस्तर वाचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Thalapathy Vijay Son: थलपती विजय यांच्या मुलाचे 5 फोटो पाहिले का?"
PTI

Thalapathy Vijay Son: सुपरस्टार थलपती विजय यांनी रविवारी (10 मे 2026) तमिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने तमिळनाडू निवडणुकीत 108 जागा जिंकून राजकारणात धमाकेदार एण्ट्री केली आहे. यादरम्यान विजय यांचे कुटुंबही सातत्याने चर्चेत आहे, विशेषतः त्यांचा मुलगा जेसन संजयबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. जेसन जरी प्रसिद्धीझोतात राहणे टाळत असला, तरी त्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. 25 वर्षीय जेसनने आता सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवले असून आपल्या वडिलांप्रमाणेच तो त्याच्या स्टाइल आणि व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असतो.

वडील थलपती विजय यांची कार्बनकॉपी 

जेसन संजयचे फोटो पाहून चाहते अनेकदा त्याला थलपती विजयची 'यंग कॉपी' म्हणतात. चेहऱ्याची ठेवण, हास्य आणि स्टाइलमध्ये जेसन बराचसा त्याच्या वडिलांसारखा दिसतो.

Advertisement

दिग्दर्शनाचा मार्ग निवडला

जिथे स्टार किड्स अनेकदा अभिनयात करिअर करतात, तिथे जेसनने दिग्दर्शनाचा मार्ग निवडला आहे. त्याने स्क्रीनरायटिंगचे शिक्षण घेतले असून सध्या तो त्याच्या पहिल्या 'सिग्मा' सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. हा सिनेमा वर्ष 2026 मध्येच प्रदर्शित होणार आहे.

(नक्की वाचा : Thalapathy Vijay: राजकारणातील धुरंधर, सिनेमाचा सुपरस्टार! थलपतीच्या 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं)

परदेशात घेतले शिक्षण

जेसनने परदेशात राहून फिल्ममेकिंग आणि स्क्रीनरायटिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्याला कथा लेखन आणि व्हिज्युअल प्रेझेंटेशनमध्ये विशेष रस आहे, यामुळेच त्याने दिग्दर्शनाची निवड केलीय.

वडिलांसोबत केले आहे काम

जेसन संजय वडील थलपती विजय यांच्यासोबत 'वेट्टाइकारन' सिनेमात दिसला होता. तसेच त्याची बहीण दिव्या साशा देखील विजयच्या 'थेरी' सिनेमात झळकली होती.

(नक्की वाचा: Trisha Krishnan Net Worth: थलापती विजयच्या यशानंतर त्रिशाची चर्चा; कोट्यवधी मालमत्तेची मालकीण असलेल्या या अभिनेत्रीची नेटवर्थ माहितीये?)

वडिलांना अनफॉलो केल्यामुळे आला होता चर्चेत

काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या की, जेसनने आपल्या नावातून वडिलांचे आडनाव काढून 'जेसन संजय एस' असे नाव वापरण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्याने वडील विजय यांना सोशल मीडियावरून अनफॉलो केल्याचेही बोलले जात होतं. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोरनलिंगम यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा आहे. संगीतापासून विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान विजयचे नाव अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबतही जोडले जात आहे

Advertisement