भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
प्रसिद्ध रंगभूषाकार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पावनखिंड, फत्ते शिकस्त, शेर शिवराज अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये देखील त्यांनी रंगभूषाकार म्हणून उत्तम जबाबदारी निभावली होती. याशिवाय प्रसिद्ध ऐतिहासिक मालिका छत्रपती शिवाजी महाराजमध्ये त्यांनी रंगभूषाकार म्हणून जबाबदारी निभावली होती.
पानिपत, बेल बॉटम, उरी, डर्टी ब्लॅकमेल, दंगल, पीके, झांशी, सुपर 30, केदारनाथ अशा अनेक सिनेमात त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून उत्तम जबाबदारी निभावली होती. सात वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आज सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.