प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजप नेत्या नमिता मीनाक्षी यांनी प्रसिद्ध मीनाक्षी सुंदरेश्वर अम्मन मंदिराच्या व्यवस्थेबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. मंदिराच्या एका अधिकाऱ्याने त्यांना दर्शन करण्यापासून रोखलं आणि हिंदू असल्याचा पुरावा देण्यास सांगितला. याबाबत मीनाक्षींनी संताप व्यक्त केलाय. माध्यमांशी बोलताना याबाबत त्यांनी धक्कादायक प्रकार सांगितला. तामिळनाडूमध्ये ही घटना घडली.
मीनाक्षींनी सांगितलं की, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी मला हिंदू असल्याचं प्रमाणपत्र मागितलं आणि सोबतच माझं जातप्रमाणपत्रही मागितलं. मी देशातील अनेक मंदिरांमध्ये गेले, मात्र मला इतका त्रास कधीच झाला नाही. मीनाक्षी यांचा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला आहे. त्यांचं लग्नही तिरुपतित झालं होतं, त्यांच्या मुलाचं नाव श्रीकृष्णाच्या नावावर ठेवण्यात आलं होतं. असं सर्व असतानाही मंदिर प्रसासनाने माझी जात आणि धर्म सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र मागितलं.
नक्की वाचा - 'मिठी मारली, चुंबन घेतलं'... मल्याळम अभिनेत्रीनं सांगितला लैंगिक छळाचा अनुभव, दिग्गजांवर केले आरोप
मात्र मंदिर प्रशासनाने या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री मीनाक्षीने मास्क घातला होता. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पतीला थांबवून ते हिंदू असल्याचं विचारण्यात आलं. पुढे मंदिर अधिकारी म्हणाले, त्यांनी अभिनेत्रीच्या मंदिराच्या परंपरेबाबत सांगितलं. अभिनेत्रीच्या स्पष्टीकरणानंतर तिच्या कपाळावर कुंकू लावण्यात आला आणि त्यांनी तिला देवी मीनाक्षीच्या दर्शनासाठी मंदिराच्या आत दर्शनासाठी घेऊन जाण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world