जाहिरात

Anupamaa Set Fire: गोरेगाव फिल्मसिटीत अग्नितांडव! 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक

Anupama Set Fire Goregaon Film City: आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यामध्ये कुठल्याही जीवित हानी झाली नसून मात्र अनुपमा या सिरीयलच्या सेट जळून खाक झाला आहे. 

Anupamaa Set Fire: गोरेगाव फिल्मसिटीत अग्नितांडव! 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक

Mumbai Goregaon Film City Anupamaa Set Fire: मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेतील फिल्मसिटीमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. सोमवारी (ता. 23 जून) सकाळी साडेसहाच्या सुमारास फिल्म सिटीमध्ये अनुपमा या मालिकेच्या सेटवर ही मोठी आग लागली. आगीची माहिती मिळतच अग्निशमन दलाचा चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यामध्ये कुठल्याही जीवित हानी झाली नसून मात्र अनुपमा या सिरीयलच्या सेट जळून खाक झाला आहे. 

Latest and Breaking News on NDTV

 समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये आज सकाळी 'अनुपमा' या प्रसिद्ध टीव्ही शोच्या सेटवर अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली, सेटवर उपस्थित असलेल्या काही लोकांनी धूर निघताना पाहिले आणि त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. काल रविवार असल्यामुळे अनुपमा या सेटवर शूटिंग बंद होते. सुदैवाने यामध्ये कुठल्याही जीवित हानी झाली नसून मात्र या सिरीयलच्या सेट जळून खाक झाला आहे

प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी उपस्थित आहे आणि आगीचे कारण तपासले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, परंतु तपास पूर्ण झाल्यानंतरच याची पुष्टी करता येईल. दरम्यान, 'अनुपमा' ही एक लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका आहे, जी दररोज लाखो प्रेक्षक पाहतात. अशा घटनेमुळे केवळ सेटचेच नुकसान झाले नाही तर शूटिंग शेड्यूलवरही परिणाम होऊ शकतो.

( नक्की वाचा : Sunjay Kapur : संजय कपूरचा शेवटचा Video Viral, मृत्यूपूर्वीचे शेवटचे क्षण पाहून उडेल थरकाप )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com