देशातील प्रत्येक चित्रपटप्रेमी कान्स चित्रपट फेस्टिवलच्या प्रतीक्षेत असतो. या फेस्टिवलमध्ये अनेक जबरदस्त चित्रपटांचं प्रिमियर होतं. कान्समध्ये प्रत्येकवर्षी विविध धाटणीच्या, विविध विषयांच्या चित्रपटांचं प्रिमियर होत असतं. यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. भारतातील या लघुपटामुळे देशाची मान उंचावली आहे. येत्या 14 मे ते 25 मे या कालवधीत कान्स फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी देश-विदेशातील अनेक चित्रपटांचं प्रिमियर होईल तर अनेकांमध्ये स्पर्धाही असेल. लघुपटांच्या यादीत FTII च्या विद्यार्थ्यांच्या फिल्मची निवड झाली आहे. एफटीआयआयने याबाबत माहिती दिली.
FTII ने दिली चांगली बातमी...
एफटीआयआयने आपला आनंद सर्वांसोबत शेअर केला आहे. FTII च्या विद्यार्थ्यांनी चित्रित केलेला लघुपट परदेशातील लघुपटांशी स्पर्धा करेल. विशेष म्हणजे निवड केलेल्या 18 फिल्ममध्ये केवळ एकच भारतीय लघुपट आहे. FTII ने यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलं, मोठी घोषणा... आम्हाला ही गोष्ट सांगायला आनंद होत आहे की, FTII च्या विद्यार्थ्यांच्या 'सनफ्लॉवर वर द फर्स्ट वन टू नो' या लघुपटाची 77 व्या कान्स फिल्म फेस्टिवलममध्ये निवड झाली आहे. जगभरातील चित्रपट संस्थांमधील 2,263 प्रवेशातून निवड करण्यात आलेल्या 18 मध्ये FTII च्या लघुपटाचा समावेश आहे. FTII च्या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे. त्यांचं कौतुक केलं जात आहे. हा लघुपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जिंकून येईल असा विश्वास लोकांनी व्यक्त केला आहे.
Big Announcement!
— FTII (@FTIIOfficial) April 24, 2024
We are honoured to share that FTII's student film "Sunflowers were the first ones to know" is selected to compete at 77th Cannes Film Festival
It is the only Indian film among 18 shorts selected from 2,263 entries by film schools all over the world. pic.twitter.com/ny2HpNU8RR
तब्बल 30 वर्षांनी भारतीय चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जागा मिळवली आहे. या फिल्मचं नाव ऑल वी इमेजिन इज लाइट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केलं आहे. या चित्रपटाकडून भारतीयांच्या अपेक्षा आहेत. गेल्या 77 वर्षांपासून कान फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातील चांगल्या दर्जाचे चित्रपट दाखवले जातात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world