Aamir Khan : 'तो खूप रोमँटिक आहे आणि रोज... आमिर खानसोबतच्या रिलेशनशिपवर गौरीचा गौप्यस्फोट

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आमिर खाननं (Aamir Khan) 14 मार्च रोजी 60 वाढदिवस साजरा केला. त्यानं जन्मदिवसापूर्वी फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानं त्याची नवी पार्टनर गौरी स्प्रेटची (Gauri Spratt) सर्वांना ओळख करुन दिली. 'मी गौरी डेट करत आहोत,' असं आमिरनं मुंबईत मीडियाशी बोलताना सांगितलं. गौरी बेंगुळुरुची आहे. यावेळी दोघांनीही एकमेकांबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. आमिर आणि गौरी एकमेकांबद्दल काय म्हणाले हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'आमिर खूप रोमँटीक आहे'

DNA इंडियाच्या रिपोर्टनुसार, आमिरनं तुझ्यासाठी सर्वात रोमँटिक गोष्ट काय केली आहे? असा प्रश्न गौरीला विचारण्यात आला. त्यावर गौरीनं सांगितलं की, आमिर खूप रोमँटिक आहे. तो रोज काही ना काही रोमँटिक गोष्टी करत असतो. 

आमिरनं सांगितलं की ते दोघं एकमेकांना 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. पण, गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करतात. आमिरनं गौरी आणि कुटुंबीयांशी ओळख करुन दिली. त्यांनी देखील गौरीचं स्वागत केलं. 

( नक्की वाचा : Kartik Aryan : 23 व्या वर्षीच 2 मुलांची आई! कोण आहे Sreeleela जिला कार्तिक आर्यन करतोय डेट? )
 

तीन मुलांचा बाप आहे आमिर

आमिर खानला तीन मुलं आहेत. त्याचं पहिलं लग्न 1986 साली रिना दत्तसोबत झालं होतं. त्यांना इरा खान आणि जुनैद खान ही दोन मुलं आहेत. जुनैद खान सध्या चित्रपटात काम करत आहे. आमिर आणि रिनाचा  2002 साली घटस्फोट झाला होता. आमिरनं त्यानंतर 2005 साली चित्रपट निर्माता किरण रावबरोबर लग्न केलं. त्यांचा 2021 साली घटस्फोट झाला. त्या दोघांना आझाद हा एक मुलगा आहे. त्याचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला.

Advertisement

आमिरचा पुढचा प्रोजेक्ट काय?

आमिरनं यावेळी 'महाभारत' या आगामी चित्रपटाबाबतही सांगितलं. त्यामध्ये काम करण्यासाठी तो उत्सुक आहे. आमिरनं या चित्रपटासाठी काम सुरु केलंय. त्यासाठी एक टीम तयार केलीय. त्याचबरोबर 2007 मधील चित्रपट 'तारे जमीन पर' चा पुढचा भाग 'सितारे जमीन पर' यामध्ये आमिर दिसणार आहे. हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होईल.