जाहिरात

Kartik Aryan : 23 व्या वर्षीच 2 मुलांची आई! कोण आहे Sreeleela जिला कार्तिक आर्यन करतोय डेट?

कार्तिक आर्यन सध्या दक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलासोबत ( Sreeleela) रिलेशनशिपमध्ये आहे, अशी चर्चा आहे. कार्तिकच्या आईनं देखील याबाबत अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केलं आहे.

Kartik Aryan : 23 व्या वर्षीच 2 मुलांची आई! कोण आहे Sreeleela जिला कार्तिक आर्यन करतोय डेट?
Kartik Aaryan and Sreeleela : कार्तिक आर्यन आणि श्रीलीला हे आगामी आशिकी 3 या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.


चित्रपट अभिनेता कार्तिक आर्यनची (Kartik Aryan ) सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आयएफा पुरस्कारात त्यानं सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. त्याचबरोबर आशिकी 3 या त्याच्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. आशिकी 3 हा या वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित लव्हस्टोरी आहे. कार्तिकची चित्रपट कारकिर्द जोरात सुरु असताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कार्तिक आर्यन सध्या दक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलासोबत ( Sreeleela) रिलेशनशिपमध्ये आहे, अशी चर्चा आहे. हे दोघं आशिकी 3 मध्ये एकत्र आहेत. त्याचबरोबर ते कार्तिकच्या कौटुंबीक कार्यक्रमातही ते एकत्र दिसले होते. कार्तिकचं वय 34 असून श्रीलीला तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. कार्तिकच्या आई माला तिवारी यांनीही या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्याचं मानलं जात आहे. 

कार्तिकच्या आईनं केलं शिक्कामोर्तब!

कार्तिकच्या आईला होणारी सून कशी असावी असा प्रश्न विचारण्यात आला होता?. त्यावेळी ती डॉक्टर असावी अशी घरी सर्वांची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलीला 2021 साली एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. कार्तिकच्या आईंच्या उत्तरानं त्यांनी श्रीलीला आणि कार्तिक रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिल्याचं मानलं जात आहे. अर्थात याबाबत या जोडप्यापैकी कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोण आहे श्रीलीला?

श्रीलीलाचा जन्म 2001 साली झाला. ती कन्नड आणि तेलुगु सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्याचबरोबर ती प्रशिक्षित भरतनाट्यम डान्सर देखील आहे. श्रीलीलानं 2021 साली एमबीबीएस होण्यापूर्वीच 'किस' या कन्नड चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.

श्रीलीला सुपरस्टार सुपरेनी प्रभाकरन यांची मुलगी असल्याचं मानलं जात होतं. मात्र पत्नीपासून घटस्फोट झाल्यानंतर श्रीलीलाचा जन्म झालाय. त्यामुळे ती आपली मुलगी नसल्याचा खुलासा प्रभाकरन यांनी केला आहे. श्रीलीलाची आई गायनॉकोलोजिस्ट आहे.

( नक्की वाचा : Chhava : 'छावा' आता इंग्रजीतही, चित्रपटाच्या दमदार यशानंतर आली आणखी एक Good News )
 

श्रीलीला सध्या 23 वर्षांची असली तरी दोन मुलांची आई आहे. तिनं 2022 सालीच गुरु आणि शोभिता या दिव्यांग मुलांना दत्तक घेत त्यांचं पालकत्व स्विकारलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार  श्रीलीलाची सध्याची संपत्ती 15 कोटी आहे. ती एका चित्रपटासाठी 4 कोटी मानधन घेत आहे.

Latest and Breaking News on NDTV

श्रीलीलानं पुष्पा - 2 या सिनेमात आयटम साँगही  केलंय. त्यासाठी तीने 2 कोटी रुपये घेतले असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर जाहिरीती, ब्रँडचं प्रमोशन तसंच लाईव्ह स्टेजवरील कार्यक्रमांमधूनही तिची चांगली कमाई होत आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: