Asambhav Movie: Gemini AI 80s Promptचा सोशल मीडियावर धुमाकूळ, असंभव सिनेमाच्या कलाकारांनाही या ट्रेंडची भुरळ

Asambhav Marathi Movie: सोशल मीडियावर व्हायरल होतोय #असंभव80s ट्रेंड, तुम्ही फोटो पाहिले का?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Marathi Celebrities Gemini AI Trend Look: मराठी कलाकारांचा जेमिनी एआय 80s लुक ट्रेंड व्हायरल"
Asambhav Marathi Movie

Asambhav Movie: सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्स व्हायरल होत असतात. मराठी चित्रपटसृष्टीत एक अनोखा आणि आकर्षक ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला ‘#असंभव80s' हा ट्रेंड सेलिब्रिटींपासून ते प्रेक्षकांपर्यंत वेगाने पसरत आहे.

80च्या लुकची मराठी कलाकारांना भुरळ | Gemini AI 80s Look Trend Viral 

जेमिनी एआयच्या (Gemini AI Tool) मदतीने 80च्या दशकातील लुकमध्ये फोटो एडिट करून या ट्रेंडमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सुमित राघवन, अंकुश चौधरी, अवधुत गुप्ते, सुबोध भावे, अभिजीत पानसे, आनंद इंगळे, संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री, सुयश टिळक, प्रिया बेर्डे, रेशम टिपणीस, कविता लाड, गौरी कुलकर्णी याच्यासह अनेक कलाकारांनी त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या कलाकारांच्या 80च्या दशकातील लुकवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रियाही येत आहे. 'असंभव80s' हा ट्रेंड व्हायरल होण्याचे कारण म्हणजे 'असंभव' चित्रपटातील 80च्या दशकातील ग्लॅम लुक! 

अंकुश चौधरी

सुबोध भावे

Advertisement

सोशल मीडियावर व्हायरल होतोय नवीन ट्रेंड

सिनेमातील कलाकारांच्या गेटअपने सर्वांनाच भुरळ घातली आहे. रिलीजपूर्वीच सोशल मीडियावर मिळत असलेला प्रतिसाद हा चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहे. चित्रपटातील वेशभूषा, रंगसंगती, सेट डिझाइन आणि कलाकारांचे गेटअप आधीच चर्चेचा विषय झाले आहेत.

Advertisement

'असंभव'चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट'चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. ‘असंभव' हा चित्रपट 21 नोव्हेंबरपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

संतोष जुवेकर 

Advertisement