Girija Oak National Crush : गेल्या काही दिवसांपासून एक्स, फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्क्रोल केलं तर तुम्हाला गिरीजा ओक नक्की दिसली असेल. मराठमोळी गिरीजा एक अवघ्या काही दिवसात नॅशनल क्रश ठरली. अनेकजण तर गिरीजाची तुलना अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनी आणि इतालवी मॉडल मोनिका बेलुतीशी करीत आहेत.
गिरीजाने मराठी चित्रपटांमध्ये फारसं काम केलं नाही. मात्र हिंदी चित्रपट, नाटक, गुजराती नाटकं, जाहिराती यामध्ये गिरीजा आवर्जुन दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याबाबत गिरीजाने एचटीला सांगितलं, मी हैराण झालेय. रविवारी सायंकाळी माझा फोन वाजत होता. मी नाटकाचा सराव करीत होते. त्यामुळे कॉल घेऊ शकत नव्हते. अचानक माझे मित्र मला कॉल, मेसेज करीत होते. एक्सवर काय सुरूये, तुला माहिती आहे का? असे मेसेज येत होते.
गिरीजा ओक गोडबोलेची मुलाखत चर्चेत
गिरीजा लवकरच आगामी वेब सीरिज 'थेरेपी शेरेपी'मध्ये गुलशन देवैयासोबत दिसणार आहे. गुलशन देवैया 'हंटर'मध्ये सई ताम्हणकरसोबत दिसला होता. या चित्रपटात त्याने सईसोबत अनेक इंटीमेट सीन केले होते. गिरीजा ओकसोबत आगामी चित्रपटात गुलशन आणि गिरीजामध्ये इंटीमेट सीन आहेत. याबाबत गिरीजा ओक पहिल्यांदाच एका मुलाखतीत व्यक्त झाली आहे. 'लंलन टॉप' या न्यूज पोर्टलने गिरीजा ओकची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचे अनेक किस्से आणि त्याच्या क्लिप सोशल मीडिया व्हायरल होत आहेत.
दरम्यान गिरीजा ओक हिची तुलना अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनी आणि इतालवी मॉडल मोनिका बेलुतीशी केली जात आहे.
(अनुक्रमे अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनी आणि इतालवी मॉडल मोनिका बेलुती)
गिरीजा ओकचं वैयक्तिक आयुष्य...
'तारे जमीन पर' या चित्रपटात अमिर खान खानसोबत गिरीजा ओकने काम केलं आहे. त्याशिवाय 'जवान' चित्रपटातही गिरीजा ओकने शाहरुखसोबत काम केलं आहे. त्याशिवाय गिरीजा 'शोर इन द सिटी' यातही झळकली. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या 'इन्स्पेक्टर झेंडे' वेब सीरिजमध्येही गिरीजा मनोज वाजपेयीच्या विरुद्ध मुख्य भूमिकेत होती. गिरीजा ओक ही प्रसिद्ध अभिनेता गिरीश ओक यांची कन्या आहे. गिरीजा ओक हिने सुह्रदय गोडबोले याच्याशी २०११ मध्ये लग्न केलं. सुह्रदय याचे वडील प्रसिद्ध पटकथा लेखक, अभिनेते, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले.