गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहूजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होत्या. दोघांमधील संबंधी ही ताणले गेल्याचं बोललं जात होतं. त्याची चर्चा सोशल मीडियावरही जोर धरत होती. अनेकांनी तर हा घटस्फोट होणारच अशा पद्धतीच्या प्रतिक्रीया दिल्या होत्या. पण आता गणेश उत्सवा दरम्यानचा गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गोविंदाने आपली भूमीका सर्वां समोरच स्पष्ट पणे सांगितली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हे दोघे एकत्र दिसले होते. त्यात त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
या व्हिडिओमध्ये सुनीता थोड्या दूर उभ्या असताना पापाराझी त्यांना आवाज देत होते. तेव्हा गोविंदा म्हणाले, "नाही थांबणार, ती आता स्टार झाली आहे." त्यानंतर सुनीता गोविंदाजवळ येऊन फोटोसाठी पोझ देतात. अलीकडेच त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे हे जोडपे चर्चेत आले होते. पण एकत्र येऊन त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. या जोडप्याने माध्यमांशी संवाद साधताना घटस्फोटाच्या सर्व अफवा चुकीच्या असल्याचे सांगितले.
सुनीता आहूजा यांनी नुकत्याच एका टीव्ही शोच्या प्रोमोमध्ये 62 वर्षांच्या वयात झालेल्या एका 'चुकी'बद्दल बोलताना हे स्पष्ट केले होते. 'पती पत्नी और पंगा' या शोमध्ये पाहुण्या म्हणून आलेल्या सुनीता यांना अभिषेक कुमार यांनी घटस्फोटाच्या चर्चांबद्दल प्रश्न विचारला होता.यावर उत्तर देताना सुनीता म्हणाल्या, "40 वर्षे सोबत राहणे सोपे नाही. चुका प्रत्येकाकडून होतात. प्रत्येक काम योग्य वयात करायला हवे. तरुणपणात चुका होतात, पण 62 वर्षांच्या वयात आणि एवढ्या मोठ्या मुलांसोबत कोण कशी चूक करेल? असं त्या म्हणाल्या.
गणेश चतुर्थीच्या वेळी माध्यमांशी बोलताना सुनीता आहूजा यांनी त्यांच्या आणि गोविंदाच्या नात्यात सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, "जर काही बिनसले असते तर आम्ही इतके जवळ असतो का? आमच्यात दुरावा निर्माण झाला असता! आम्हाला कोणीही वेगळे करू शकत नाही, जरी देव आला किंवा सैतान आला तरीही आम्हाला कोणीही वेगळे करू शकणार नाही असं सांगत त्यांनी आमच्या दोघांचा संसार चांगला चालला असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे.