जाहिरात

Weight Loss Journey: सलमानची हिरोईन, पण वजन 100 किलो, जादूची कांडी फिरली अन् घटवलं 43 किलो वजन

तिने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ मात्र तिला मिळाले. त्यामुळेच ती तब्बल 43 किलो वजन कमी करू शकली.

Weight Loss Journey:  सलमानची हिरोईन, पण वजन 100 किलो, जादूची कांडी फिरली अन् घटवलं 43 किलो वजन

Zareen Khan Weight Loss Journey: बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानने नुकतीच तिच्या वेट लॉस जर्नीबद्दल माहिती दिली आहे. एकवेळ 100 किलो वजन असलेल्या झरीनने तब्बल 43 किलो वजन कमी केलं आहे. आता तिने आपलं वजन 57 किलोवर आणले आहे. तिने हे कसं करून दाखवलं याबद्दलचा खुलासा एका मुलाखतीत केला. झरीन खानने सलमान खानसोबत 'वीर' (2010) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीला तिला तिच्या वजनामुळे खूप टीका सहन करावी लागली. तिने सांगितले की, 'माझं फिल्मी बॅकग्राउंड नव्हतं. इंडस्ट्रीमध्ये कोणीही गॉडफादर नव्हता. त्यामुळे मला प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागले. पण तिने ट्रोलर्सकडे लक्ष दिले नाही. फिटनेस ही तिच्यासाठी नेहमीच पहिली पसंत होती असं तीने सांगितलं. 

नक्की वाचा - Google Gemini AI फोटो सोडा, रिंकू राजगुरू लग्नबाबत पहिल्यांदाच काय बोलली पाहा

झरीनने सांगितले की, वजन कमी करण्यासाठी तिने खूप कठोर मेहनत घेतली. यात कठोर ट्रेनिंग, एमएमए (MMA) आणि टेनिसचा समावेश होता. सुरुवातीला तिने फक्त लिक्विड डाएटवर भर दिला होता. पण नंतर तिने संतुलित आहार आणि फिटनेस रुटीन फॉलो केले. 2018 मध्ये तिने 100 किलोवरून 57 किलो वजन कमी केले. याशिवाय, तिने स्टॅमिना वाढवण्यासाठी पिलेट्स, वेट ट्रेनिंग, स्विमिंग आणि जॉगिंगही केले. तिने दर दोन तासांनी थोडे थोडे खाऊन आपले मेटाबॉलिज्म वाढवले. नंतर योगावर अधिक लक्ष केंद्रित केले.

नक्की वाचा - हॉरर चित्रपट, 25 थिएटरमध्ये रिलीज! 104 कोटी बजेट, कमाई 3858 कोटी, चित्रपट पाहाणारे अनेक महिने...

झरीनच्या कुटुंबातील कोणी ही व्यक्ती बॉलिवूडमध्ये नाही. त्यामुळे तिला प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागले. तिने कधीही ट्रोलर्सची पर्वा केली नाही. तिच्या मते, 'कलाकाराचे काम महत्त्वाचे असते, त्याचे शरीर नाही.' फिटनेसला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या झरीनने सांगितले की, वाढत्या वजनासाठी ती आपल्या कुटुंबातील अनुवांशिक कारणांना जबाबदार मानते. वजन कमी करण्यासाठी तिने खूप कठोर परिश्रम घेतले. सुरुवातीला तिने फक्त लिक्विड डाएटवर लक्ष केंद्रित केले. तिने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ मात्र तिला मिळाले. त्यामुळेच ती तब्बल 43 किलो वजन कमी करू शकली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com