जाहिरात

Grammy Awards 2025: हद्दच केली! पुरस्कार सोहळ्यात मॉडेलने कपडे उतरवले, नग्न झाली; VIDEO व्हायरल

या पुरस्कार सोहळ्यात दिग्गज कलाकारांचा जलवा पाहायला मिळाला असतानाच प्रसिद्ध रॅपर कान्यो वेस्टची पत्नी बियांका सेंसरीने केलेल्या कृतीने एकच खळबळ उडाली आहे.

Grammy Awards 2025: हद्दच केली! पुरस्कार सोहळ्यात मॉडेलने कपडे उतरवले, नग्न झाली; VIDEO व्हायरल

Grammy Awards 2025: संगीत विश्वातील सर्वात मानाचा समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. दरवर्षीप्रमाणे लॉस एंजेलिसमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते. एकीकडे या पुरस्कार सोहळ्यात दिग्गज कलाकारांचा जलवा पाहायला मिळाला असतानाच प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टची पत्नी बियांका सेंसरीने केलेल्या कृतीने एकच खळबळ उडाली आहे. बियांका सेंसरी या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर नग्न झाली, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट आणि त्याची पत्नी बियांका सेंसरी हे ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. मात्र बियांका सेंसरीने केलेल्या धक्कादायक कृतीमुळे दोघांनाही बाहेर काढल्याचं सांगण्यात येत आहे. बियांकाने ग्रॅमी सोहळ्याच्या रेड कार्पेटवर थेट नग्न होत पोझ दिल्या, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. बियांका सेंसरीचा हा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बियांका पती कान्येबरोबर रेड कार्पेटवर वॉक करत पापाराझींसमोर येते. यामध्ये तिने काळ्या रंगाचे जॅकेट घातल्याचे दिसत आहे. मात्र काहीच क्षणात ती तिचे हा काळे जॅकेट उतरवते आणि नग्न लूकमध्ये पोज देते. यावेळी तिने पारदर्शक कपडे घातल्याचेही दिसत आहे, ज्यामुळे सोहळ्यात सहभागी झालेले सेलिब्रेटीही थक्क झाले. 

(नक्की वाचा-  CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली)

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात कान्ये वेस्टला दोन पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. तो ग्रॅमी रेड कार्पेटवर पूर्णपणे काळ्या रंगाच्या कॅज्युअल पोशाखात आला होता. त्याला सर्वोत्कृष्ट रॅप गाण्यासाठी नामांकन मिळाले होते. मात्र  कान्येची पत्नी बियांकाने तिच्या फॅशन स्टेटमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने लांब काळ्या कोटखाली एक पारदर्शक ड्रेस घातला होता. तिच्या याच ड्रेसमुळे कार्यक्रमात गोंधळ झाला आणि हा संपूर्ण वाद निर्माण झाला.