Dharmendra : हेमा यांना ती इज्जत मिळाली नाही, धर्मेंद्रंच्या अंत्यसंस्कारावरून प्रसिद्ध लेखिका असं का म्हणाली

Dharmendra Funeral: प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका शोभा डे यांनी देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर साध्या पद्धतीने करण्यात आलेल्या अंत्यसंस्काराबाबत विधान केलंय.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Dharmendra: धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का करण्यात आले नाही?"

Dharmendra Funeral: 'बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याऐवजी देओल कुटुंबीयांनी अतिशय गुप्तपणे त्यांना अखेरचा निरोप देण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र यांची दोन्ही मुलं सनी आणि बॉबी देओल यांनी आपल्या कुटुंबीयांसह जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार विधी पार पाडला. दुसरीकडे हेमा मालिनी देओल कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या प्रार्थनासभेमध्येही सहभागी झाल्या नव्हत्या. 

अलीकडील एका मुलाखतीत पत्रकार आणि लेखिका शोभा डे यांनी देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्यावर साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याच्या निर्णयावर भाष्य केले. तसेच धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा यांना अधिक सन्मान मिळायला हवा होता, असेही त्यांनी म्हटलं.

'धर्मेंद्र यांना राजकीय सन्मान मिळायला हवा होता'

विक्की लालवानी यांच्याशी संवाद साधताना शोभा यांना विचारण्यात आले की, दिवंगत दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांना राजकीय सन्मान देण्यात यायला हवा होता का? यावर त्या म्हणाल्या की,'मी पूर्णपणे सहमत आहे, याबाबत मी लिहिलंही आहे. यापूर्वीही सिनेसृष्टीतील अशा कित्येक लोकांना हा सन्मान देण्यात आला आहे आणि ते या सन्मानास पात्र होते. लोक त्यांच्यावर खूप प्रेम करत होते. असे वाटले की ही एखादी चूक असावी किंवा यामागे काही राजकीय कारणे असावीत. त्यांच्या आणि हेमांच्या पार्श्वभूमीचा विचार करता, कदाचित यासाठी फक्त एक फोन कॉल पुरेसा होता. जर श्रीदेवी यांना राजकीय सन्मान मिळू शकतो, त्या देखील खूप लोकप्रिय स्टार होत्या तर निश्चितच धर्मेंद्र यांच्यासारख्या व्यक्तीलाही हा सन्मान मिळायला हवा होता."

'हेमा यांचा एक फोन पुरेसा होता'

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) सदस्य होते, हे सांगत शोभा पुढे म्हणाल्या, "धर्मेंद्र गंभीर स्वरुपात आजारी होते, हे सर्वांनाच माहीत होते. त्यामुळे जर काही आयोजन करायचे असते, तर ते त्या काळात होऊ शकले असते. असे का झाले नाही? हे मला माहीत नाही. हेमा स्वतः एक फोन कॉल करू शकल्या असत्या. त्या खासदार आहेत आणि भाजपा पक्षात बर्‍यापैकी उच्च स्थानीवर आहेत."

Advertisement

(नक्की वाचा: Dharmendra Prayer Meet: धर्मेंद्र यांच्यासाठी वेगळी प्रार्थनासभा आयोजित का केली? घरातील विषयावर हेमा मालिनी पहिल्यांदाच थेट म्हणाल्या...)

शोभा पुढे असंही म्हणाल्या की, "कदाचित कुटुंबालाच राजकीय सन्मानासह अंत्यसंस्कार नको असावे. असे का झाले नाही, हे सांगणारी मी कोण आहे? पण तरीही हे थोडे विचित्र आणि अत्यंत निराशाजनक वाटतंय. त्या 40 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांच्या पत्नी होत्या, या गोष्टीवर त्यांनी वारंवार भर दिला आहे. पक्षातील मोठ्या नेत्यांनी त्यांना अधिकृतपणे पत्नी म्हणून मान्यता दिली होती की नाही, याची मला काहीच कल्पना नाही."

Advertisement

(नक्की वाचा: Dharmendra News: धर्मेंद्र-हेमा मालिनींच्या नातवाचा फोटो पाहिला का? चेहरा पाहून चाहत्यांना हीमॅनची आली आठवण)

24 नोव्हेंबर 2025 रोजी झालं निधन

धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर हेमा मालिनी आणि सनी-बॉबी यांनी वेगवेगळ्या प्रार्थना सभेचे आयोजन केले होते.

Advertisement