'हेरा फेरी' चित्रपटाचा विचार करताच लगेच ती त्रिकुट डोळ्या समोर येते. ज्यांची जागा आजपर्यंत कोणीही घेऊ शकलेले नाही. ते म्हणजे परेश रावल, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार. त्यांच्याशिवाय या चित्रपटाची कल्पना करणेही कठीण आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता या चित्रपटाचा तिसरा भाग ही येणार आहे. पण त्यात एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. ती म्हणजे परेश रावल यांनी या चित्रपटातून माघार घेतली आहे. सुरुवातीला असे म्हटले जात होते की, मतभेदामुळे परेश रावल यांनी चित्रपट सोडला, पण या चर्चांना पूर्णविराम देत परेश रावल यांनी स्वतः ट्विटरवर सांगितले की ते मतभेदामुळे या चित्रपटापासून वेगळे झालेले नाहीत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परेश रावल यांनी कोणतेही ठोस कारण दिले नाही, परंतु त्यांच्या आणि निर्मात्यांमध्ये मतभेद असल्याच्या अफवा त्यांनी दूर केल्या आहेत. आता परेश रावल म्हणजेच बाबू भैय्या या चित्रपटातून बाहेर पडण्याबद्दल सुनील शेट्टी यांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, "परेश रावल यांच्याशिवाय 'हेरा फेरी' बनू शकत नाही..." बाबू भैय्या शिवाय हा चित्रपट होणे शक्यच नाही. एक वेळी राजू आणि शाम यांना रिप्लेसमेंट होवू शकते पण बाबू भैय्यासाठी नाही असं सुनिल शेट्टी यांनी सांगितलं.
सुनील शेट्टी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, "माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. मी पूर्णपणे निराश झालो आहे. मी एखाद्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होतो, तर तो 'हेरा फेरी' होता असं ते म्हणाले. हा चित्रपट परेश रावल यांच्याशिवाय 100% बनूच शकत नाही. तो 99% माझ्या आणि अक्षयशिवाय बनू शकतो. जर राजू आणि श्यामला बाबू भैय्याने मारले नसते, तर हे काम झाले नसते." सुनील शेट्टी यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की, चित्रपटातील मूळ कलाकारांची जोडी तुटल्यास या चित्रपटाची खरी मजा निघून जाऊ शकते.
दरम्यान परेश रावलनं चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अक्षय कुमार चांगलाच नाराज झाला आहे. अक्षय कुमारनं परेश रावल यांना 25 कोटींची कायदेशीर नोटीस बजावली आहे. अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. हेराफेरी 3 या सिनेमा मधून अचानक बाहेर पडल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. अक्षय कुमार बरोबर मतभेद झाल्यामुळे परेश रावल या चित्रपटातून बाहेर पडल्याचं बोललं जात होतं.