जाहिरात

Hera Pheri 3 : अक्षय कुमारनं परेश रावलला पाठवली 25 कोटींची नोटीस! 'या' कारणामुळे संतापला अभिनेता

Hera Pheri 3 : अभिनेता अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यातील वाद तीव्र झाला आहे. अक्षय कुमारनं परेश रावल यांना 25 कोटींची कायदेशीर नोटीस बजावलीय.

Hera Pheri 3 : अक्षय कुमारनं परेश रावलला पाठवली 25 कोटींची नोटीस! 'या' कारणामुळे संतापला अभिनेता
मुंबई:

Hera Pheri 3 : अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Sunil Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांचा 'हेराफेरी' हा हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सदाबहार सिनेमा समजला जातो.  2000 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सुपरहिट ठरला होता. प्रियदर्शननं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा अनेक वेळा पाहिलेले कित्येक फॅन्स आहेत. काही वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. तसंच आता तिसरा भाग (Hera Pheri 3) प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात असलेल्या फॅन्सना काही दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला होता. हेराफेरीच्या कॉमेडीचा एक्का असलेले बाबू भैय्या म्हणजेच परेश रावल यांनी हा सिमेमा सोडण्याचा निर्णय घेतला होता. 

परेश रावलनं चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अक्षय कुमार चांगलाच नाराज झाला आहे. अक्षय कुमारनं परेश रावल यांना 25 कोटींची कायदेशीर नोटीस बजावलीय. अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसकडून ही नोटीस बजावण्यात आलीय. हेराफेरी 3 या सिनेमा मधून अचानक बाहेर पडल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. 

मैंने प्यार किया कितीदा पाहिलाय? 'या' 5 गोष्टी माहिती आहेत का? सलमानचं सत्य समजल्यावर बसेल धक्का

( नक्की वाचा :  मैंने प्यार किया कितीदा पाहिलाय? 'या' 5 गोष्टी माहिती आहेत का? सलमानचं सत्य समजल्यावर बसेल धक्का )

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या  प्रॉडक्शन हाऊसने परेश रावल यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' साठी कायदेशीर करार (लीगल कॉन्ट्रॅक्ट) केला होता आणि शूटिंगही सुरू केली होती. त्यानंतर अचानक त्यांनी चित्रपट सोडला. त्यांच्या या निर्णयामुळे चित्रपटाचे नुकसान झाले आहे, ज्याच्या बदल्यात निर्मात्यांनी 25 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली, अशी माहिती आहे.

अक्षय कुमारच्या 'केप ऑफ द गुड फिल्म्स' या प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटात गुंतवणूक केली आहे. आता परेश रावल या सिनेमातून बाहेर पडल्यानं अक्षयचे मोठे नुकसान होऊ शकते, असे मानले जात आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com