'हेरा फेरी 3'मध्ये परेश रावल ऐवजी दिसणार हा अभिनेता? नव्या बाबू भैय्याबद्दल तुमचे काय मत?

परेश रावलनं चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अक्षय कुमार चांगलाच नाराज झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

'हेरा फेरी 3' मधून परेश रावल बाहेर पडल्याची बातमी आल्यापासून, प्रियदर्शनच्या पुढील चित्रपटात बाबू भैय्या कोण असेल, याबद्दल चाहत्यांनी तर्क-वितर्क लावायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यावर काहींनी नवा बाबू भैया कोण असे हे ही सांगितले आहे. तर काहींनी काही नावं ही सुचवली आहेत. अनेक लोकांनी या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठीचे नाव सुचवले आहे. याबाबत जेव्हा पंकज त्रिपाठीला विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी काही स्पष्ट केलं नाही. कदाचित ते त्या चित्रपटाचा भाग असल्यानेच अचानक त्याचे नाव सोशल मीडियावर चर्चेत आले असावे असा तर्क लावला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी याबाबत विचारण्यात आले. सोशल मीडियावर लोक 'हेरा फेरी 3' साठी बाबू भैय्यासाठी तुमचे नाव सुचवत आहेत. त्यासाठी तुम्हाला चित्रपटात घेतलं पाहीजे असंही काही जण सांगत आहेत.  यावर पंकज म्हणाले, "असेच काहीतरी मी ऐकले आणि वाचले आहे. मी यावर विश्वास ठेवत नाही. परेशजी एक उत्कृष्ट अभिनेते आहेत. मी त्यांच्यासमोर काहीच नाही. मी त्यांचा खूप आदर करतो. मला नाही वाटत की मी या भूमिकेसाठी योग्य आहे." अशी भूमीका त्यांनी मांडली. 

ट्रेंडिंग बातमी -  Hera Pheri 3 : अक्षय कुमारनं परेश रावलला पाठवली 25 कोटींची नोटीस! 'या' कारणामुळे संतापला अभिनेता

पण ही भूमीका आली तर स्विकारणार की नाकारणार याबाबत ते काही बोलले नाहीत. पंकज त्रिपाठी लवकरच 'क्रिमिनल जस्टिस 4' मध्ये दिसणार आहे, ज्यात बरखा सिंग, मोहम्मद झीशान अय्यूब, सुरवीन चावला, मीता वशिष्ठ, आशा नेगी, श्वेता बसू प्रसाद आणि खुशबू अत्रे देखील आहेत. २९ मे ला तो पाहाता येणार आहे. पण परेश रावल यांच्या ऐवजी पंकज त्रिपाटी यांचे नाव समोर आल्याने पडद्या मागे तसं काही होत आहे का याची ही चर्चा आता सुरू झाली आहे. ओ माय गॉडमध्ये ही पंकज त्रिपाटी अक्षय कुमार बरोबर दिसले होते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Hera pheri 3: 'हेरा फेरी 3' मधून परेश रावल बाहेर, अक्षयनंतर सुनील शेट्टीची प्रतिक्रीया काय?

दरम्यान परेश रावलनं चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अक्षय कुमार चांगलाच नाराज झाला आहे. अक्षय कुमारनं परेश रावल यांना 25 कोटींची कायदेशीर नोटीस बजावली आहे. अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. हेराफेरी 3 या सिनेमा मधून अचानक बाहेर पडल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. अक्षय कुमार बरोबर मतभेद झाल्यामुळे परेश रावल या चित्रपटातून बाहेर पडल्याचं बोललं जात होतं. बाबू भैय्या शिवाय हा चित्रपट होणे शक्यच नाही अशी प्रतिक्रीया सुनील शेट्टी यांनी दिली होती.  

Advertisement