- २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हे बेबी' चित्रपटातील एंजेलची भूमिका जुआना सांघवीने केली होती
- जुआना सांघवी केवळ सतराशे महिन्यांची असतानाच तिच्या हास्याने प्रेक्षकांचे मन जिंकले होते
- फरदीन खानने जुआनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शूटिंगदरम्यान सिगारेट ओढणे सोडले होते
Juanna Sanghvi: 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हे बेबी' (Heyy Babyy) या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. शिवाय भावूकही केले. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात एका लहान मुलीने आपल्या गोंडसपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ही चिमुकली म्हणजे 'एंजेल', जिची भूमिका जुआना सांघवी हिने साकारली होती. तिला आजही कोणी वसरू शकत नाही. तिचे हस्य आणि गोड चेहरा प्रत्येकाच्या मनात आहे. आता 18 वर्षांनंतर या 'एंजेल'चे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिचे सौंदर्य पाहून तुम्ही ही आवाक व्हाल. सोशल माडियावर तर तिचे सौंदर्य पाहून कमेंटचा पाऊस पडत आहे.
'हे बेबी'च्या चित्रीकरणाच्या वेळी जुआना केवळ 17 महिन्यांची होती. तिचे हास्य आणि निरागस हावभाव पाहून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले होते. चित्रपटात तीन मित्रांच्या आयुष्यात ही लहान मुलगी आल्यावर कशी धमाल उडते, हे दाखवण्यात आले होते. अनेक दृश्यांमध्ये तर तिने बड्या स्टार्सनाही मागे टाकले होते. खुद्द फरदीन खानने एकदा सांगितले होते की, जुआनासोबत शूटिंग करताना त्याने सिगारेट ओढणे सोडून दिले होते, जेणेकरून तिच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये.
जुआना सांघवी आता 22 वर्षांची झाली आहे. नुकतेच तिच्या वाढदिवसाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. लहानपणीची तीच क्युटनेस आणि गालावर पडणारी खळी अजूनही कायम आहे. मात्र आता तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तीच्या सौंदर्यानं तिचे चाहते भारावले आहे. तिच्या गालावर पडणारी खळी सर्वांनाच आकर्षीत करते. जशी लहानपणी ती गोड होती तशीच मोठे पणी ही ती खुपच सुंदर दिसते.
सोशल मीडियावर जुआनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "आमची क्यूट एंजेल आता मोठी झाली आहे", अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. जुआना पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तिने मोठ्या पडद्यावर यावे असं तिच्या चाहत्यांना वाटतं. मात्र त्याबाबत जुआना काय विचार करते हे अजून ही स्पष्ट झालेलं नाही. पण 18 वर्षानंतर तिचे फोटो समोर आल्यानंतर तिने आपली उपस्थितीती बॉलिवूडमध्ये दाखवून दिली आहे हे मात्र नक्की.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world