Dharmendra News : बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबरला वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. १९३५ मध्ये धर्मेंद्र यांचा जन्म झाला. यानंतर १९५८ मध्ये त्यांनी टॅलेंट हंट जिंकून बॉलिवूडमध्ये प्रवेश केल आणि काही दिवसात सुपरस्टार बनले. धर्मेंद्र यांनी २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि बिकानेरचे खासदारही झाले.
अभिनयाच्या करिअरमध्ये ३०० हून अधिक चित्रपट करणाऱ्या धर्मेंद्र यांचा पद्मभूषण सारख्या अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. मात्र तरीही कोणत्याही शासकीय इतमामाशिवाय त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी मिरवणूक काढण्यात आली नाही. ना चाहत्यांना त्यांचं शेवटचं दर्शन घेता आलं. परंतू असं का घडलं?
धर्मेंद्र यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का केले नाही? l (Why is Dharmendra not cremated with state honours?)
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती प्रशासनाला वेळेवर देण्यात आली नव्हती. राज्य सन्मान प्रक्रियेअंतर्गत कुटुंबाला सरकारला एक अधिकृत प्रस्ताव पाठवावा लागतो. ज्यासाठी काही वेळ लागतो. मात्र धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून याबाबत काही पाऊल उचलली नसल्याचं सांगितलं जातंय. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कित्येक तास मीडियालाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नव्हती. खूप घाईगडबडीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - Dharmendra: ना हेमा मालिनी ना प्रकाश कौर! धर्मेंद्र यांचं पहिलं प्रेम कोण? फाळणीमुळे अपूर्ण राहीली प्रेम कहाणी
धर्मेंद्र यांचं पार्थिक स्मशानभूमीत घेऊन गेल्यानंतर त्यांचं निधनाचं वृत्त समोर आलं. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनीदेखील थेट स्मशानभूमीत पोहोचल्या. सलमान खान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान सारखे अनेक कलाकार अचानक माहिती मिळताच थेट स्मशानभूमीत दाखल झाले. शाहरुख खान यांना स्मशानभूमीत पोहोचायला उशीर झाला होता. ते धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोहोचले.
धर्मेंद्र यांचा अनेक पुरस्काराने सन्मान
धर्मेंद्र यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी १९९७ मध्ये फिल्मफेयरचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. यानंतर २०१२ मध्ये धर्मेंद्रला पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. हा भारत सरकारकडून दिला जाणारा सन्मान आहे, जो विशिष्ट सेवा देणाऱ्या नागरिकांना दिला जातो.
राज्य सन्मानासाठी कुटुंबाला काय करावं लागतं?
राज्य सन्मानासाठी कुटुंबाला सर्वात आधी राज्य प्रशासनाला याबाबत माहिती द्यावी लागते आणि राज्य सन्मानाची मागणी केली जाते. सरकारला एक निवेदन पाठवावे लागते, यामध्ये निधन झालेल्या व्यक्तीची कामगिरी आणि पुरस्कारांसह त्यांनी केलेल्या सार्वजनिक सेवेचा उल्लेख करावा लागतो. कुटुंबाची सहमती, मृत्यूचं प्रमाणपत्र आणि ओळखपत्रासारखी कागदपत्र दिल्यानंतर सरकारकडून राज्य सन्मानासाठी मंजुरी दिली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडून सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. एबीपी हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कोणत्या अभिनेत्यांना राज्य सन्मान मिळाला आहे?
अनेक बॉलिवूड व्यक्तिमत्त्वांना राज्य सन्मान मिळाला आहे. यामध्ये मनोज कुमार, लता मंगेशकर, श्रीदेवी, शशी कपूर, पंकज उधास आणि दिलीप कुमार सारखे अभिनेते समाविष्ट आहेत.