हॉरर चित्रपट, 25 थिएटरमध्ये रिलीज! 104 कोटी बजेट, कमाई 3858 कोटी, चित्रपट पाहाणारे अनेक महिने...

हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही अनेक विचित्र घटना घडल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

हॉरर चित्रपट पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. हॉरर चित्रपट म्हटला की सस्पेन्स आणि भय हे आलच. काही हॉरर चित्रपट तर असे आहेत, जे एकट्याने पाहताना घाम फुटतो. जर चुकून एखादा हॉरर चित्रपट रात्री पाहिला तर  भीतीने झोप लागत नाही असं अनेकांसोबत झालं आहे. आता हॉरर चित्रपटांमध्ये विनोदावरही भर दिला जात आहे. ज्यामुळे चित्रपटाच्या भयानक दृश्यांवर कमी आणि विनोदावर जास्त लक्ष दिलं जात आहे. पण आधीचे हॉरर चित्रपट फक्त आणि फक्त भयानक असायचे. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला त्या हॉरर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही चुकूनही एकट्याने पाहू नका. कारण Google च्या नजरेत हा सर्वात भयानक चित्रपट आहे.

जगातील सर्वात भयानक चित्रपट
बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षी 'स्त्री 2' (Stree 2) आणि 'मुंज्या' सारख्या हॉरर कॉमेडी चित्रपटांनी मनोरंजन केले. पण ज्या चित्रपटाबद्दल आम्ही सांगत आहोत तो आजपासून 51 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाला आजही जगातील सर्वात भयानक चित्रपट म्हटले जाते. Google वर सर्वात भयानक चित्रपट शोधल्यावर याच चित्रपटाचे नाव येते. या चित्रपटाला एक प्रकारे शापित देखील मानले गेले आहे. 1973 मध्ये रिलीज झालेल्या या हॉरर चित्रपटाचे नाव 'द एक्सॉर्सिस्ट' आहे. जो अनेक देशांमध्ये बॅन झाला होता. हा हॉरर चित्रपट विलियम पीटर यांच्या कादंबरीवर आधारित आहे. असे म्हटले जाते की हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक लोकांना मानसिक धक्का बसला होता. यामुळे हा चित्रपट आयर्लंड, इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये बॅन झाला होता. IMDb ने चित्रपटाला 8.2 रेटिंग दिली आहे.

नक्की वाचा - Prajakta Koli Marathi Movie: प्राजक्ता कोळीचे मराठी सिनेमात डेब्यु, पहिल्याच प्रोजेक्टमध्ये धमाकेदार एण्ट्री

हॉरर चित्रपट 'द एक्सॉर्सिस्ट'ची कथा खूप भयानक आहे. चित्रपटाच्या कथेत एक निरागस मुलगी आहे. जिच्यावर एक वाईट आत्मा कब्जा करतो. या मुलीची आई एक अभिनेत्री आहे. जी आपल्या मुलीच्या विचित्र वागण्यामुळे त्रस्त होते. अभिनेत्री आई आपल्या मुलीला एका पाद्रीला दाखवते. मुलीच्या शरीरात गेलेल्या भूताचा प्रभाव संपवण्यासाठी ती संघर्ष करते. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य काळजाचा थरकाप उडवणारे आहेत.

नक्की वाचा - Google Gemini Trend: अशी ही बनवाबनवीच्या सुधाचे जेमिनी ट्रेंड फोटो नेटकरी म्हणाले: तू किती गं नाजूक गोरी पान..

Advertisement

हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही अनेक विचित्र घटना घडल्या होत्या. या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर आग लागली होती. काही क्रू मेंबर्सचा त्यात मृत्यू झाला होता. तसेच, जेव्हा तो चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता, तेव्हा अनेक प्रेक्षकांना हृदयविकाराचा झटका ही आला होता. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. 104.96 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 3,858.94 कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय केला होता हे विशेष. असं ही सांगितलं जातं की हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण काही महिने नीट झोपलेही नव्हते.