जाहिरात

Prajakta Koli Marathi Movie: प्राजक्ता कोळीचे मराठी सिनेमात डेब्यु, पहिल्याच प्रोजेक्टमध्ये धमाकेदार एण्ट्री

Prajakta Koli First Marathi Movie: सोशल मीडियास्टार प्राजक्ता कोळी मराठी सिनेमामध्ये पदार्पण करत आहे. सिनेमाचे नाव काय आहे, सिनेमा कधी रिलीज होणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Prajakta Koli Marathi Movie: प्राजक्ता कोळीचे मराठी सिनेमात डेब्यु, पहिल्याच प्रोजेक्टमध्ये धमाकेदार एण्ट्री
"Prajakta Koli First Marathi Movie Name: प्राजक्ता कोळीच्या पहिल्या मराठी सिनेमाचे नाव काय आहे"

Prajakta Koli First Marathi Movie: काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) त्याचा आगामी सिनेमा "क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम"ची घोषणा केली होती. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर मनोरंजन करत भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण अलिबाग आणि आसपासच्या भागात यशस्वीरित्या पूर्ण झालंय. 

सिनेमाच्या घोषणेनंतरच यामध्ये कोणकोण कलाकारमंडळी दिसणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत आता सिनेमाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. पोस्टमध्ये कलाकारांचे चेहरे जरी दिसत नसले तरी चित्रपटात दमदार कलाकारांची तगडी फौज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

'क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम' सिनेमाची तगडी स्टारकास्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, तरुण पिढीचे स्टार्स अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर, लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोग, कादंबरी कदम, तसेच हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह सोशल मीडियास्टार प्राजक्ता कोळी प्रथमच मराठी सिनेमामध्ये दिसणार आहे. या सर्व ताकदीच्या कलाकारांचा अभिनय या सिनेमामध्ये पाहायला मिळणार म्हणजे प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

"...हीच माझी खरी ताकद" : हेमंत ढोमे

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात,"माझे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यात झाले आणि आता माझा हा चित्रपट जो मराठी शाळांबद्दलच आहे त्याचं चित्रीकरण मला याच भागात करता आले याचा प्रचंड आनंद आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला होता आणि आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. माझ्यासोबत असलेले हे सर्व कलाकार आणि माझी संपूर्ण टीम या चित्रपटाची खरी ताकद आहेत. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल."

Priyadarshini Indalkar Dashavatar Saree: प्रियदर्शिनी इंदलकरचा दशावतार स्पेशल साडी लुक पाहिला का? फोटो पाहून प्रेमात पडाल

(नक्की वाचा: Priyadarshini Indalkar Dashavatar Saree: प्रियदर्शिनी इंदलकरचा दशावतार स्पेशल साडी लुक पाहिला का? फोटो पाहून प्रेमात पडाल)

क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. 

Neha Pendse Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड लुक, ऑफशोल्डर ट्रान्सपरंट ड्रेसमधील स्टायलिश फोटो पाहिले?

(नक्की वाचा: Neha Pendse Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड लुक, ऑफशोल्डर ट्रान्सपरंट ड्रेसमधील स्टायलिश फोटो पाहिले?)

सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

लवकरच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com