Alia Bhatt Gym Workout Video : बॉलिवूडची'गंगूबाई'आलिया भट्ट सध्या तिचा आगामी स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘अल्फा'मुळे चर्चेत आहे.या चित्रपटातून आलिया भट्ट पहिल्यांदाच स्पाय अॅक्शन चित्रपटामध्ये झळकत आहे. तसच आलियासोबत शरवरी वाघही अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.आलियाबद्दल बोलायचे झाले तर अॅक्शन चित्रपटांमध्ये काम करण्यालाठी तिने जिममध्ये कंबर कसली आहे.त्यामुळे ती शारीरिकदृष्ट्या फिट होत आहे. आलिया तिचं आरोग्य आणि फिटनेसकडे नेहमीच लक्ष देते. तसच आलिया जिममधील वर्कआऊटचे व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करत असते. जिममधील वर्कआऊटचा असाच एक जबरदस्त व्हिडीओ आलियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.या व्हिडीओत रणबीर कपूरही व्यायाम करत असल्याचं पाहायला मिळत आहे.आलिया भट्ट 32 व्या वर्षी एका बाळाची आई झाली. त्यानंतर आलियाने जिममध्ये जबरदस्त वर्कआऊट करून स्वत:ला फिट केलं.
30 प्लस आलिया भट्ट इतकी फिट कशी?
खरं तर, आलिया भट्टचा वर्कआउट रूटीन खूप कठीण आहे. यात योगा, पिलाटेस, कार्डिओ, ट्रेनिंग, प्लँक आणि स्ट्रेंथ अशा हेवी वर्कआउटचा समावेश आहे. याशिवाय आलियाच्या रूटीनमध्ये स्क्वॅट्स, पुश-अप्स आणि पुल-अप्ससारख्या एक्सरसाइजही आहेत. व्हायरल व्हिडिओमध्येही आलिया हे सर्व करताना दिसते. आलिया भट्टच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्हाला फक्त तिचे ग्लॅमरस फोटोच नाही, तर फिटनेस सीक्रेट्सचे व्हिडिओही पाहायला मिळतील. या व्हिडिओंमध्ये तुम्ही पाहाल की वेट लिफ्टिंगसोबत आलिया ट्रेडमिलवर धावण्यासारख्या कार्डिओ एक्सरसाइजही करते. याशिवाय आलिया माउंटन क्लाइंबिंग, बेअर क्रॉलिंग, हॉस्टेज जंप्स आणि गोरिल्ला हॉप्ससारखे कठीण वर्कआउटही करते.
नक्की वाचा >> महिलेनं धावत्या ट्रेनमध्ये शिजवली मॅगी! Video व्हायरल होताच मध्य रेल्वेने उचललं कठोर पाऊल
30 प्लस आलिया भट्ट एवढी फिट कशी झाली?
आलिया भट्टचा वर्कआउट रूटीन खूप कठीण आहे.यात योगा,पिलाटेस,कार्डिओ,ट्रेनिंग,प्लँक आणि स्ट्रेंथ अशा वर्कआउटचा समावेश आहे.याशिवाय आलियाच्या रूटीनमध्ये स्क्वॅट्स,पुश-अप्स आणि पुल-अप्ससारख्या व्यायामाचे प्रकारही आहेत.आलिया भट्टच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्हाला फक्त तिचे ग्लॅमरस फोटोच नाही,तर फिटनेस सीक्रेट्सचे व्हिडिओही पाहायला मिळतील.या व्हिडिओंमध्ये तुम्ही पाहाल की वेट लिफ्टिंगसोबत आलिया ट्रेडमिलवर धावण्यासारख्या कार्डिओ एक्सरसाइजही करते. याशिवाय आलिया माउंटन क्लाइंबिंग,बेअर क्रॉलिंग,हॉस्टेज जंप्स आणि गोरिल्ला हॉप्ससारखे कठीण वर्कआउटही करते.
नक्की वाचा >> अक्षय कुमारही घाबरायचा, शाहरुखच्या करिअरलाही होता धोका, 'तो' अभिनेता 'या' एका चुकीमुळे बनला 'बी ग्रेड'हिरो
आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती‘जिगरा'(2024)या चित्रपटात दिसली होती.त्यानंतर ती काही काळ फिल्म शुटिंगपासून दूर राहिली होती.आता या अभिनेत्रीच्या पदरात दोन मोठ्या बजेटचे चित्रपट पडले आहेत.‘अल्फा'सोबतच पती रणबीर कपूर आणि ‘राजी'चा को-एक्टर विक्की कौशलसोबत ‘लव्ह अँड वॉर'या चित्रपटाचा समावेश आहे.संजय लीली भन्साली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. आलिया पती रणबीर कपूरसोबत दुसऱ्यांदा चित्रपटात झळकणार आहे.यापूर्वी या स्टार कपलने ‘ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र काम केले होते.