Woman Prepares Maggie Inside The Train : मुंबईची लोकल ट्रेन असो किंवा देशभरात धावणारी एक्स्प्रेस..प्रवाशांनी भरलेल्या या ट्रेन्समध्ये अनेकदा काहीतरी भन्नाट गोष्टी घडतात. कधी विंडो सीटवरून वादविवाद होतात, तर कधी दरवाज्यात स्टंटबाजी करून प्रवासी आपला जीव धोक्यात टाकतात. पण नुकताच ट्रेनमधील एक असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. एक महिला इंडियन रेल्वेच्या एसी कोचमध्ये मोबाईल चार्जिंग पॉईंटला किटली लावून मॅगी बनवते.महिलेचा हा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. महिलेनं केलेल्या धक्कादायक प्रकारामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.
रेल्वेने उचललं कारवाईचं पाऊल
व्हिडीओ व्हायरल होताच सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत एक्स हँडलवर कठोर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की,ट्रेनमध्ये इलेक्ट्रॉनिक किटलीचा वापर करण्यास बंदी आहे. हे फक्त असुरक्षित आणि बेकायदेशीर नाही, तर दंडनीय गुन्हा आहे.रेल्वेने महिलेला इशारा देत म्हटलं की,अशा प्रकारच्या कृतींमुळे आगीच्या घटना घडू शकतात आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
नक्की वाचा >> 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल', पत्नीच्या डिलिव्हरीच्या दिवशी कर्मचाऱ्याला सुट्टी नाही, मॅनेजरवर लोक भडकले
मध्ये रेल्वेने ट्वीटरवर म्हटलंय की,व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेवर आणि पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. महिलेनं केलेल्या कृत्यामुळे वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि ट्रेनच्या एसी तसेच इतर तांत्रिक गोष्टींचं नुकसान होऊ शकतं.
Action is being initiated against the channel and the person concerned.
— Central Railway (@Central_Railway) November 21, 2025
Using electronic kettle inside trains is strictly prohibited.
It is unsafe, illegal, and a punishable offence. It can lead to fire incidence and be disastrous for other passengers also.
May also cause… https://t.co/di9vkxrDLv
सोशल मीडियावर चर्चा रंगली
महिलेच्या ट्रेनच्या या व्हायरल व्हिडीओला 65 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला कमेंट करत एका यूजरने म्हटलंय की,"ही एक धोकादायक कृती आहे.सर्व प्रवाशांनी हे समजून घ्यायलं हवं". दुसऱ्या यूजरने म्हटलं,"जर आग लागली असती तर मोठा अपघात झाला असता.तसच रेल्वेने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही कृतीबद्दल अधिकाऱ्यांना तातडीनं कळवा, जेणेकरून ट्रेनमध्ये प्रवाशांची सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world